अहमदनगर : चाँदबिबी महाल येथून एकास आडवूण मोटार सायकल व मोबाईल चोरणारा चोरटा मुद्देमालासह ताब्यात
नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई
नमुद बातमीतील हकीकत अशी की, फिर्यादी नामे अक्षय विजयकुमार ढमाळ वय २६ वर्षे रा. चितळी ता. पाथर्डी यांनी दिनांक ५ / ६ / २०२२ रोजी नगर ता. पोस्टे येथे फिर्याद दिली की, मी दि. ४ / ६ / २०२२२ रोजी रात्री ११/३० वा सुमा. आंबेगाव, पुणे येथून माझी मोटार सायकल क्रमांक MH १६ BT १६६४ ही वरुन चितळी ता. पाथर्डी जात असताना नगर ते पाथर्डी रोडवर बारदारी शिवारात बारदरी फाटाजवळ मी रात्री २/०० वा चे सुमारास लघुशंकेसाठी गाडी रोडच्या कडेला उभी करुन थांबलो असता तेथे एका मोटार सायकवल दोन अनोळखी इसम आले व त्यांनी माझे मोटारसायकल व कपडयाची बॅग व मोबाईल असे चोरुन घेवून गेले मी त्याच्या पाठलाग केला परंतु ते मला मिळून आले नाही अशा मजकुराची फिर्याद दिली.
सदर घटनेचे गांर्भीय लक्ष्यात घेवून श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोउनि युवराज चव्हाण, पोउंनि रणजित मराग, पोहेकॉ/धर्मराज पालवे, पोहेकॉ / सुभाष थोरात, पोकों / कमलेश पाथरुट, पोकों/संभाजी बोराडे, पोकॉ/ राजू खेडकर, पोकों/विक्रांत भालसिंग यांना तपासाबाबत आदेश देवून सुचना व मार्गदर्शन केले.
सदर पथकांने सदर गुन्ह्याच्या तपास करीत असतांना श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा इसम नामे अमोल ढोबळे रा. आखेगाव ता. शेवगाव यांनी केलेला आहे व तो सध्या शेवगाव येथे आहे. त्यानुसार सदर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक शेवगाव येथे जावून सदर आरोपीचा शोध घेतला असता तो तेथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल जगन्नाथ ढोबळे वय २४ वर्षे रा. आखेगाव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर असे सांगितले. सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिले परंतु त्यास विश्वासात घेवून विचारले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरी केलेली मोटार सायकल व मोबाईल काढून दिला. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल व मोबाईल व आरोपी यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणलेली आहे. व मा. न्यायालयात पोलीस कस्टडी रिपोर्टसह हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीयांस २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ / धर्मराज पालवे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले साो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ / धर्मराज पालवे, पोहेकॉ / सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकों/संभाजी बोराडे, पोकॉ/राजू खेडकर, पोकॉ/विक्रांत भालसिंग यांचे पथकाने केलेली आहे.