Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर
    Ahmednagar

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    newstoday24By newstoday24April 25, 2025Updated:April 25, 2025No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    kedgaon Murder News : केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर परिसरात २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रेणुका माता मंदिराजवळ घडली असून मृत तरुणाचे नाव विपुल छोट्या काळे (वय ३०, रा. देवी मंदिरामागे, शास्त्रीनगर) असे आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात विपुल यांच्या आई शास्त्री छोट्या काळे (वय ६०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, विपुल याचा काही दिवसांपूर्वी सुरेश जाटला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे (सर्व रा. दूध सागर सोसायटी, केडगाव), चाईन फायर काळे, दारूचंद फादर चव्हाण व सुंदर नितीन काळे (सर्व रा. साठे वस्ती, शेंडी, ता. नगर) यांच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता.

    २४ एप्रिल रोजी सायंकाळी विपुल काळे आपल्या बहिणी मीना चव्हाण, लसी चव्हाण आणि दुर्गेश चव्हाण यांच्यासोबत भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेला असताना, वरील आरोपींनी त्याला शास्त्रीनगर परिसरात अडवून पूर्वीच्या वादाच्या रागातून जबर मारहाण केली. लाकडी दांडके, दगड तसेच लाथाबुक्क्यांचा वापर करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

    घटनेनंतर दुर्गेश चव्हाण यांनी ही माहिती विपुलच्या आईला दिली. त्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या असता विपुल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. विपुलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी शास्त्री काळे यांच्या फिर्यादीवरून वरील सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    #breaking #Crime #News #Police #kedggaon #murder
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार
    Next Article मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024

    कडाची वाडी येथे कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीस्वार ठार

    September 27, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.