Close Menu
    What's Hot

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    पारनेरच्या नगरपंचायतीत महाआघाडीचा झेंडा; लंके यांचा विरोधकांवर घणाघात

    November 12, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश
    Ahmednagar

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    newstoday24By newstoday24November 14, 2026Updated:November 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राहुरीच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १५ दिवस सुरू राहणार आवर्तन, उभ्या पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

    अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला उद्या (दि. १५) संध्याकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार अक्षय कर्डिले यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी सोडण्याचा निर्णय मार्गी लागला आहे.

    या आवर्तनाचे पाणी १७ ते १८ नोव्हेंबरपर्यंत राहुरी तालुक्यात पोहोचणार असून, त्यानंतर पुढील पंधरा दिवस कालव्याद्वारे पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील कानडगाव, निमढेरे, तुळापूर, कामधेनू परिसर, कनगर, गणेगाव, चिंचविहिरे आणि गुहा यांसह पश्चिम भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या या भागातील शेतकऱ्यांसमोर उभ्या पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान होते. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.

    या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. कर्डिले यांनी या मागणीसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.पंधरा दिवसांच्या या आवर्तनामुळे पश्चिम राहुरीतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

    #akshaykardile #rahuri #newstoday24
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपारनेरच्या नगरपंचायतीत महाआघाडीचा झेंडा; लंके यांचा विरोधकांवर घणाघात
    Next Article नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.