अहमदनगर : जीवनज्योत मेडिकल फौंडेशन अहमदनगरतर्फे नर्सिंग अ./ऑपरेशन थिएटर असिस्टंट/टेक्निशिअनचे कोर्सेस
अहमदनगर – जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन नगर, ‘मानवसेवा हिच ईश्वर सेवा’ हे ध्येय लक्षात घेता या उद्देशपुर्तीसाठी जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन 1994 मध्ये उदयाला आली. मानवी जीवनाचा दर्जा उंचविण्यासाठी आरोगय बरोबर ज्ञानाची जोड आणली पाहिजे. जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनव्दारे रोजगार / स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी देणारे विविध पॅरामेडिकल आणि व्होकेशनल कोर्सेस संस्थेमार्फत चालविले जातात. ही संस्था महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ, मुंबईशी सलग्न आहे. जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकिय शोध संस्था आहे. ही संस्था वैद्यकिय सुविधा, शिक्षण व जनजागृतीसाठी उदयाला आलेली आहे. तसेच स्वयंरोजगाराची संधी आणि मानवी राहणीमान उंचविण्याची क्षमता या संस्थेमध्ये मिळू शकेल. हीच खरी मानवी सेवा व राष्ट्रीय सेवा आहे, आजच्या चांगल्या आर्थिक व्यवस्थेत व वाढत्या वैद्यकिय व्यवसाय व सुविधांमुळे पॅरामेडीकल क्षेत्रात कौशल्य प्राप्त लोकांची जास्त मागणी आहे, कि जे (सुशिक्षित) लोक आपले आयुष्य या क्षेत्रात कार्य करण्यास तयार आहेत.
अहमदनगर येथील मुकुंदनगर मधील ’बॉम्बे नर्सिंग होम व पॉलिक्लिनिक’च्या इमारतीमध्ये ही संस्था आहे. ही इमारत 3 मजली असुन येथे सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणाबरोबरच इमारतीमध्ये सर्व सुविधा तसेच सुसज्ज आधुनिक फर्निचर यांचा समावेश आहे. या संस्थेमध्ये उच्च विद्याविभुषित तसेच नावाजलेल्या व्यक्तींचा स्टाफ, यामध्ये डॉक्टर्स, समुपदेशक, पॅथालॉजिस्ट तसेच शिक्षकांचा सहभाग आहे. सर्व सोयीयुक्त व सुसज्ज असे वसतीगृह असुन मुलींचे व मुलांचे असे वेगवेगळे वसतीगृह आहे. अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पीटलमध्ये / कार्यशाळेमध्ये भरपुर प्रॅक्टीस दिली जाते. ऑपरेशन थिएटर असिस्टंट / टेक्निशिअन कोर्स केल्यानंतर विद्यार्थी ओ. टी. इनचार्जला असिस्ट करु शकतो. तसेच हॉस्पीटलमध्ये ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य व सामग्री तयार करुन देणे. ओ.टी. निर्जंतुकीकरण या सर्वाची जबाबदारी घेणे. सर्जनला असिस्ट करणे, भुल देणार्या डॉक्टरास असिस्ट करणे; ओ. टी. चे सामग्री व औषधांची नोद ठेवणे. ओ.टी मध्ये लागणार्या वेगवेगळया ट्रॉलीज व ट्रे तयार करणे, ओ. टी. च्या उपकरणाची देखरेख करणे व हाताळणे, पेशंटची ओ. टी. मध्ये, भुलीच्या परिस्थितीत व रिकव्हरी रुममध्ये देखरेख करणे. संगणकाचा वापर करुन ओ. टी. च्या कामकाजाची नोंद ठेवणे इ. कामे करु शकतो. या कोर्ससाठी पात्रता दहावी पास व कोर्सचे कालावधी एक वर्ष आहे.
नर्सिंग केअर म्हणजेच हॉस्पीटल मधील रुग्णांशी संबधीत विविध कार्यामध्ये औषधांचे व्यवस्थापन, इंजेक्शन, सलाईन यांच्या नियमित वेळा तसेच बेडमेकीग, अत्यवस्थ रुग्णांची काळजीही वेळोवेळी करणे असल्यामुळे नियमित रुग्णापासुन त्यांना वेगळे ठेवले जाते. यामूळेच जास्त नर्सेसची आवश्यकता भासते. नेमुन दिलेल्या वेळेमध्येच औषधे रुग्णांना देणे, वार्ड नर्सिंग कार्यक्षमता ही रुग्णांच्या सेवेची कामे ज्यामध्ये तांत्रिक बाबींना वगळुन जो फक्त प्रशिक्षित नर्सिग केअर करु शकतो. प्रशिक्षित नर्सिग केअर डयुटीवर असलेल्या नर्स इनचार्जला मदत तसेच इतर नर्सिगची मदत करणारी कामे करु शकतो. वार्ड स्वच्छता व काळजी यांची देखभाल नर्सिंग केअर करु शकतो. विविध छोटया मोठ्या हॉस्पीटल मध्ये नर्सिग केठ्ची गरज लक्षात घेवुन वरील प्रशिक्षण हे शासनाने ठेवलेले आहे. विविध सिस्टर इन्चार्ज किंवा नर्स पेशामध्ये भरपुर सक्रिय अशी आहे, की जे प्रशिक्षित (असिस्टंट) मदतनीस करु शकतो. नर्सिग केअर प्रमाणपत्र धारण केलेला विद्यार्थी हा ड्युटीवर असणार्या नर्स इनचार्जला सर्वतोपरी मदत करु शकतो. ज्यामुळे नर्स इनचार्ज ही पुर्णता व योग्य पेशंटची काळजी घेऊ शकते. जो विद्यार्थी 10 वी पास आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. असा विद्यार्थी संपुर्ण महाराष्ट्रामधील तालुका स्तरावरील छोट्या दवाखान्यामध्ये काम करु शकतो. अशाप्रकारे हे प्रशिक्षण मोठया प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी देतेट्या कोर्सचा कालावधी एक वर्ष आहे.
हे कोर्स पुर्ण केल्यावर जिल्हा परिषद व विविध शासकिय, निमशासकिय नगरपालिका, महानगरपालिका, मलेरिया विभाग व इतर विभागात आरोग्यसेवक (MPW) पदावर शासकिय नोकरीची संधी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकिय नोकरीची संधी. तसेच खाजगी मल्टीस्पेशालिटी व सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये नोकरीची संधी. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे व बेराजगारीवर मात करण्याचे साधन आहे हे ओळखुन संस्थेमार्फत वेगवेगळे व्यावसायिक कोर्स चालविले जातात. प्रत्येक कोर्ससाठी लागणारी अत्याधुनिक साधन सामुग्री, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रशस्त जागा, प्रात्याक्षिक हॉल यासारखी अनेक सुविधा संस्थेच्या इमारतीमध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टीकल वर्क करता यावे यासाठी संस्था विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करत असते. बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी होस्टेल व मेस यांची सुविधा पुरविली जाते. संस्थेने विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान दिल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आयुष्यात व मुलाखतीच्या वेळी होतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात मिळतो. संपर्क: बॉम्बे हॉस्पीटल बिल्डींग, वनविभागमागे, नगर औरंगाबाद रोड अहमदनगर. मो. 8830685732 उपरोक्त पदासाठी मागणी जास्त व उमेदवार कमी असल्यामुळे नोकरीची 100% संधी. On line admission साठी www.jjmf.info वर भेट द्या.