नेवासा : घरात घुसून कपाटातील दोन लाख चाळीस हजार चोरून नेणाऱ्या एल.सी.बी.पोलीस कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करा
नगरसेविका श्रीमती फिरोजबी पठाण यांची मागणी
नेवासा(प्रतिनिधी)घरात घुसून कपाटातील दोन लाख चाळीस हजार चोरून नेणाऱ्या एल.सी.बी.चे पोलीस कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नेवासा येथील नगरपंचायतच्या नगरसेविका श्रीमती फिरोजबी पठाण यांनी नेवासा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना नगरसेविका श्रीमती फिरोजबी ईमामखान पठाण म्हणाल्या की आपण जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे एलसीबी च्या पोलीसांवर कार्यवाही होऊन गुन्हा दाखल करावा म्हणून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे सांगितले याबाबत अधिक सविस्तर माहिती देतांना त्या म्हणाल्या की मी नेवासा येथे माझी मुले, सुना व नातवंडे यांचेसह राहते. दि. २९/०५/२०२३ रोजी माझे दोन नातू शेवगाव येथून येत असतांना त्यांना नगर एल.सी.बी.चे लोकांनी भेंडा येथे अडविले व कोणतीही विचारपूस न करता त्यांचेविरुध्द खोटया मजकुराचा भा.द.वि.३२८. १८८ वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल केला.
त्या गुन्ह्यामध्ये मंगळवारी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास एल.सी.बी.चे पोलीस सचिन आडबल,शिवाजी ढोकणे, रवी कर्डिले,रणजीत जाधव, मनोज गोसावी, अमृत आढाव असे लोक खाजगी वाहनातून आमचे नेवासा खुर्द येथील घरात त्यांनी कोणतीही विचारपूस न करता बेकायदेशीरपणे आमचे राहते घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी घरामध्ये मी माझी सून, व दोन नातसूना होत्या. वरील सर्व पोलीस अचानक घरात घुसल्याने आम्ही घाबरून गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही पोलीस आहोत तुम्ही गुपचुप बसा, आम्ही घराची झडती घेत आहोत असे म्हणून आमच्या बेडरूममध्ये गेले व कपाटातील झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा आमचे कपाटात ठेवलेले २ लाख ४० हजार रुपये पोलीसांना सापडले पैसे मिळाल्यानंतर त्यांनी झडती घेण्याचे बंद केले व पैसे घेऊन निघून गेले.
एल.सी.बी च्या अश्या दहशतवादामुळे आमचे संपुर्ण कुटूंब घाबरलेले आहे व आमचे कष्टाचे पैसे वरील पोलीसांनी विनापरवाना आमचे घरातून चोरी करून नेलेले आहेत. म्हणून वरील सर्व पोलीसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
एल.सी.बी. चे वरील पोलीसांविरुध्द त्यांनी आमचे राहत्या घरात बेकायदा प्रवेश करुन घरातील कपाटातील २,४०,०००/- रुपये चोरी करुन नेले म्हणून त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.
चौकट:-सदर पत्रकार परिषदेत बोलतांना नगरसेविका फिरोजबी पठाण यांचे चिरंजीव सादिक पठाण म्हणाले की आम्ही घरात असतांना देखील पोलिसांनी आमचे बंधू अल्ताफ पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या अन्यायाच्या विरोधात एलसीबीच्या पोलीसांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कारवाई न केल्यास आम्ही एस पी कार्यालयावर मोर्चा नेऊ असा इशारा यावेळी बोलतांना दिला.”