अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळणार?
अहमदनगर : राष्ट्रवादीतील बंडाळी नाट्यात पडद्याआड राहून नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांशी संपर्कात राहून अजित पवार यांच्याशी त्यांचे बोलणे करून देण्यापासून ते त्या- त्या आमदारांना ‘कव्हर’ करण्यापर्यंतच्या भूमिका संग्राम जगताप यांनी बजावल्या. काही अत्यंत महत्वाचे निरोप आणि बैठका करून देण्याचे नियोजनही त्यांनी पार पाडले.
अजित पवार यांचे बंड जाहीरपणे समोर येण्याआधी पाच- सात दिवस संग्रामजगताप या संपूर्ण प्रक्रियेत राहिले.
अजित पवार यांनी बंडाळी आणि भाजपा सोबत जाण्याबाबत आपल्या अत्यंत मोजक्या शिलेदारांना माहिती दिली होती आणि त्यात संग्राम जगताप यांचेही नाव होते. त्यामुळेच आता मंत्रीमंडळ विस्तारात लाल दिवा अथवा महत्वाचे महामंडळ संग्राम जगताप यांना मिळू शकते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.