अहमदनगर मधील वसंत लोढा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल… वसंत लोढा पोलिसांच्या ताब्यात
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कपाशी येथील शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची 11490358 एक कोटी चार लाख 90 हजार 358 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगरच्या वसंत लोढा यांच्यासह अन्य तीन जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी फिर्याद दाखल केली असून या प्रकरणाची हकीगत अशी की शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये वेळोवेळी इंजिनिअरींगची अनेक प्रकारची कामे केली जातात. सन 2021 मध्ये आमच्या इंडस्ट्रीजमध्ये काही इंजिनीअरींगची कामे करणे आवश्यक असल्याने आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांकडुन त्याबाबत कोटेशन मागवत होतो. त्यावेळी फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अॅक्युरेट इंजिनिअरींग अण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी त्यांचे कोटेशन आमच्या कंपनीत दिले होते. सदर कोटेशनबरोबर वरील दोन्ही इसमांनी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतचे शासनाचे शिक्के व सह्या असलेले दाखले जोडलेले दिले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला विश्वास दिला की आम्ही यापुर्वी वेगवेगळ्या कंपन्यांची कामे पुर्ण करुन दिलेली आहेत. आम्ही तुमच्या ही कंपनीचे चांगले व वेळेत काम पुर्ण करुन देईन असे म्हणुन त्यांनी आमचा विश्वास संपादन केला. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवर आम्ही विश्वास ठेवुन आमच्या इंडस्ट्रिजचे काम वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांचेकडुन करुन घेण्याची बोलणी कापशी येथे शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. कापशी येथे केली. त्याप्रमाणे फॅब्रिक्स इंडस्ट्रीज यांना दिनांक 3/8/2021 रोजी वर्क ऑर्डर दिली व दिनांक 10/8/2022 रोजी अँक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांना वर्क ऑर्डर दिली. वरील दोन्ही कंपनींना कामाचे स्वरुपानुसार वेळोवेळी वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. वरील दोन्ही कंपनीने आम्हाला वेळोवेळी बिले सादर केली त्याप्रमाणे शरयु अँग्रो इंडस्ट्रिज लि. कापशी यांनी फॅब्रिक्स इंडस्ट्रीज यांना एकुण
16725876/- रुपये दिले व अॅक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांना एकुण 8612837/- रुपये आर. टी. जी. एस. द्वारे वेळोवेळी दिलेले आहेत. परंतु फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अँक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी कंपनीचे वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ करु लागले. त्यावेळी आम्ही वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांनी दिलेली कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे बनावट, खोटे व तयार केलेले असल्याचे लक्षात आले. वरील दोघांनीही महाराष्ट्र शासनाचे व वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी, कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के तयार करुन त्याचा दुरुपयोग करुन स्वत:ला काम मिळवण्यासाठी त्यांनी आमची फसवणुक केली असल्याचे आमचे लक्षात आले. त्यानंतर आम्हास शंका आल्यानंतर आम्ही आमच्या कंपनी ऑडीटर कडुन व इंजिनिअरींगमधील तज्ञ व्यक्तींकडुन दिलेली वर्क ऑर्डर केलेले काम व नवीन इन्स्टॉल केलेले साहीत्य याची तपासणी केल्यानंतर तसेच कंपनीमध्ये बाहेरुन नवीन साहीत्य आलेले नसलेबाबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच गेटवरील इनवर्ड आऊटवर्ड रजिष्टरवरील नोंदीवरुन आमचे लक्षात आले की, वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांनी आमचे कंपनीमधील संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर), महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर), संजय अनिरुद्ध मुळे (सिनिअर इंजिनिअर) यांना हाताशी धरुन त्यांचेशी
संगणमत करुन त्यांना पैशाचे अमिष देऊन कंपनीमधील मशिनरी व साहीत्य, पॅनल बॉक्स, पाईप हे सर्व नवीन टाकले आहे तसेच नवीन काम केलेले आहे असे भासवुन वसंत लोढा याने 9157282/- रुपयांची व प्रसाद आण्णा यांने 2333076/- रुपयांची खोटी बिले सादर करुन त्याच्या रक्कमा कंपनीकडुन घेऊन वरील सर्वांनी आर्थीक फसवणुक करुन विश्वासघात केला आहे. वरील लोकांनी कंपनीची फसवणुक केलेली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी सदरची रक्कम कंपनीमध्ये जमा केलेली नसल्याने अखेर कंपनीने या सर्वांवर भादवी कलम ३४,४०८,४२०,४६७,४६८,४७१नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सातारा पोलिसांनी अहमदनगर शहरात येऊन कोतवाली पोलिसांच्या मदतीने अहमदनगर मधील वसंत लोढा यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.