शिर्डीतील पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बंगल्यावर छापा
1 पीडित मुलींची सुटका, 2 आरोपी अटक
Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
( प्रतिनिधी)आज दि. 02/08/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 1 पिडीत मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि दौलत किसन लटके , अकुश संजय घोडके या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके यांचे कौतुक केले.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर Ad sp यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI गुलाबराव पाटील, HC इरफान शेख,PN कुऱ्हे,PN शिंदे, PN जाधव ,LPN भांगरे , PC गांगुर्डे यांनी केली.