अहमदनगर : मोहरम उत्सवात पो.उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी बजावले चोख कर्तव्य…
अहमदनगर शहरात मुस्लिम धर्मियांचा मोहरम निमित्त सवारी स्थापनेपासून ते १० दिवसाच्या मोहरम उत्सव काळात काढण्यात येणारी चादर मिरवणुक, कत्तलची रात्र, सवारी विसर्जन मिरवणूक यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, नगर शहरातील शांतता कायम टिकून राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने उत्तम नियोजन करत आपले कर्तव्य बजावले, तसेच झेंडीगेट परिसरात झेंडीगेट पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी देखील खबरदारी घेत सतर्क राहून शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कामगिरी करत आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली, मोहरम उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज होत पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले दरम्यान मुस्लिम धर्मियांच्या मोहरम सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत खांद्यावर घेवून नाचण्याची प्रथा आहे, आणि त्या परंपरेनुसार यंदा मोहरम निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत स्थानिक नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना खांद्यावर उचलून घेत नाच देखील केला आणि त्यांचा हा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडताना पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी मोहरम मिरवणूकीत ३०७ दाखल असणाऱ्या आरोपीच्या खांद्यावर बसून नाच केला म्हणून गजेंद्र इंगळे यांना निलंबित करण्याची मागणी केली मात्र खर पाहिलं तर मोहरम मिरवणुकीत आरोपीने नाही तर स्थानिक नागरिकांनीच पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना खांद्यावर घेतले असल्याचे बोलले जात आहे