Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या ह्या नेत्यानी केली मागणी.
    Breaking

    मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या ह्या नेत्यानी केली मागणी.

    newstoday24By newstoday24February 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या ह्या नेत्यानी केली मागणी.

    मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलने केली. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं. या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले
    भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी थेट मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.
    राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर मनोज जरांगेविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.
    राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांची ही मागणी मान्य केली आहे.

    #Breaking #Update #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleशहरातील डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता – आ.संग्राम जगताप
    Next Article इतक्या जागा लढवणारच : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपबाबत महायुतीत शिवसेनेचा निर्णय ठरला,
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.