Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»
    Maharashtra

    newstoday24By newstoday24February 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सडून मरेल पण मागे हटणार नाही… अटक केली तर… मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा काय ?

    छत्रपती संभाजीनगर   : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणी आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ‘ मी मागे हटणार नाही. त्यांचं म्हणणं १० टक्के आरक्षण घ्यावं, मात्र मी आरक्षण दिलं तरी थांबणार नाही. अटक केली तरी पोलीस ठाणे कुठेही आंदोलन करणार आहे. सडूनं मरेल पण मागे हटणार नाही.१० टक्के ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं. मात्र आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे.किती दिवस सरकार दडपशाही करत ते बघू’ अस मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही चौकशी नेमली मराठे तुमच्या विरोधात आहे.अटक केली तर सगळीकडे पांढर दिसेल, असा इशारा त्यांनी दिला.

    यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करत असल्याचं त्यांनी नमूद केले. परीक्षा सुरू असल्याने 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित पण साखळी उपोषण सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

    यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, मी मागे हटणार नाही. मी 10टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ज्यांना 10 टक्के आरक्ष घ्यायचं त्यांनी घ्यावं पण आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे. सरकार किती दिवस दडपशाही करत ते बघू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीय द्वेष करत आहे. मराठ्यांविषयी खुन्नस गृहमंत्री बंदूक दाखवून देत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

    गोरगरीब मराठ्यांनी मतदान केलं, म्हणून तुमच्या नेत्यांनी तुम्हाला जवळ केलं. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जाता की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं, असेही जरांगे म्हणाले. गृहमंत्री जाणीवपूर्वक करत आहे तुम्ही अशांतता पसरवू देऊ नका. दूध का दूध पाणी का पाणी, होऊन जाऊ द्या, असं ते म्हणाले.

    #Breaking #BJP #Maratha
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticlePrevious Post
    Next Article Next Post
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.