भिंगारचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
पाणी, आरोग्यासह मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन
छावणी परिषदेने नागरिकांचे ज्वलंत प्रश्न अजेंड्यावर घेवून तातडीने सोडवावे -संजय सपकाळ
अहमदनगर – भिंगारच्या विविध प्रश्न संदर्भात भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले. तर आरोग्यासह मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शिवम भंडारी, युवक कार्याध्यक्ष अभिजीत सपकाळ, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष संकेत झोडगे, सरचिटणीस विशाल (अण्णा) बेलपवार, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, अशोक पराते, जहीर सय्यद, अर्जुन बेरड, दीपक लिपाने, सुदाम गांधले, मतीन ठाकरे, संपत बेरड आदी उपस्थित होते.
भिंगार छावणी हद्दीत विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर बोअरवेल नादुरुस्त असल्याचे पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही रस्त्यांचे काम रखडले असून, छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर जॉगिंग पार्कमध्ये ओपन जीमचे साहित्य व मुलांचे खेळणे तुटले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी भिंगार छावणी हद्दीतील बोअरवेलची दुरुस्ती करावी, भिंगारवाला बंगला ते इराणी बंगला पर्यंतचा रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करावे, छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर व कर्मचारी वाढवून सर्व सुविधा उपलब्ध कराव्या, पंचशील वेस ते साईबाबा मंदिर खळेवाडी पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करून रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, जॉगिंग पार्कमध्ये ओपन जीम व लहान मुलांची खेळणी, कारंजा व लाइटिंगची दुरुस्ती करावी, जॉगिंग ट्रॅकवर लाल माती टाकून बंद अवस्थेत असलेली साऊंड सिस्टिम दुरुस्त करावी, स्वच्छतेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे अध्यक्ष यांना देखील पाठविण्यात आले आहे.
भिंगार छावणी परिषदेचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. छावणी परिषदेत निधीचा मोठा प्रश्न असल्याने अनेक कामे प्रलंबीत राहत आहे. प्रशासनाने नागरिकांचे ज्वलंत प्रश्न अजेंड्यावर घेवून तातडीने सोडविण्याची गरज आहे. -संजय सपकाळ (शहराध्यक्ष, भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस)