भिंगार मधील विकासकामांसाठी 9 कोटींचा निधी मंजूर
भिंगारच्या विकास कामासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल भिंगार वासीयांनी आ. संग्राम जगताप यांचे मानले आभार
नगर : शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी राज्य शासनाने नव्याने 85 कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा, विकासकामांसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आ. जगताप यांच्या माध्यमातून विकासकामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकासकामे होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकासनिधी देवून नगर शहराच्या विकासाची नव्याने पायाभरणी केली आहे.
आ.जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखविला आहे भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल 9 कोटींचा भरीव निधी मिळाला आहे त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे. आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकासकामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये भिंगार वासयांनी दिली. दरम्यान भिंगारच्या विकास कामासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल भिंगार वासीयांनी आ. संग्राम जगताप यांचे आभार मानले. यावेळी संजय सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, शिवम भंडारी, विशाल बेलपवार, मतीन शेख, शुभम टाक, सिद्धार्थ आढाव, किशोर उपरे, अक्षय नागापुरे, सुरेश मेहतांनी, सागर चंवडके, गणेश लंगोटे,आकिल शेख, अनिल तेजी, आनंद दळवी आणि समस्त भिंगारवासी उपस्थित होते.