बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.
दोन्ही रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे – खा.डॉ.सुजय विखे पाटील
नगर : बोल्हेगाव नागापूर उपनगर हे झपाट्याने विकसित होत. असून या परिसरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास येत आहे. मात्र बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला आहे. या परिसरातील कॉलनीना जोडणारे मुख्य रस्ते आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला असून त्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. .
बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप,समितीचे मा.सभापती कुमारसिंह वाकळे, दत्ता पाटील सप्रे, राजेश कातोरे, आकाश कातोरे, मदन आढाव आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, बोल्हेगाव नागपूर परिसर हा शहराचे एक मोठे उपनगर बनले आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे. त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्या या दृष्टीने या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला. तसेच नगरसेवक कुमारसिंह वाकळे या भागाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असतात या रस्त्याच्या दोन्ही कामांमुळे बोल्हेगाव नागापूरच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला जाणार आहे असे ते म्हणाले.
मा.सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, बोल्हेगाव गणेश चौक व चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर हे दोन्ही रस्ते या भागाचे मुख्य असून या रस्त्यांची दैना अत्यंत वाईट झाले आहे. नागरिकांना पायी देखील चालले कठीण झाले आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आ.संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार दोन्ही रस्त्यांचे काम मार्गी लागत असल्याने नागरिकांचा अनेक दिवसांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे मनाला समाधान वाटत आहे असे ते म्हणाले.