शेतकरी देशाचा आत्मा आहे – प्र कुलगुरू डॉ .जोगेंद्रसिह बिसेन
फुले महाविघालयात हिदी साहित्यात शेती विषयावर राष्ट्रीय चर्चा.
संपूर्ण जगाला अन्नपुरवठा करणारा एकमेव शेतकरी आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत जग अस्तित्वात राहील.ज्या दिवशी शेतकरी संपेल त्या दिवशी देश अस्तित्वात राहणार नाही. म्हणून शेतकरी हा देशाचा आत्मा आहे असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी ‘हिंदी साहित्य और किसान विमर्श’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रंसगी किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात सोमवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संलग्नीत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी साहित्य और किसान विमर्श’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सोमवार (दि. १८ ) रोजी करण्यात आले होते.या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विचारमंचावर महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ शीतला प्रसाद दुबे, उद्घाटक प्र कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन प्रमुख मार्गदर्शक तथा बिजभाषक कलकत्ता येथील ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक सौ मधु कांकरिया, प्रमुख उपस्थिती श्री छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव बोडके, शिक्षण संस्थेचे सचिव तथा आयोजक प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांची होती यावेळी मान्यवराच्या शुभहस्ते महात्मा फुले, स्वामी रामानंद तीर्थ आणि हिदी साहित्यीक प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन समारंभ सपन्न झाला त्यानंतर प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी प्रास्ताविक मांडताना किसान विमर्श राष्ट्रीय सत्रासाठी विषय ठेवण्यासाठी ची भूमिका स्पष्ठ करून. सहभागी प्राध्यापक प्रतिनिधीचे स्वागत केले त्यानंतर मान्यवराच्या शुभहस्ते हिंदी साहित्य आणि किसान विमर्शवर आलेल्या संशोधन पेपर चे प्रकाशन करण्यात आले यावेळी उद्घाटनपर प्र.कुलगुरू डॉ बिसेन पुढे बोलताना म्हणाले की साहित्यिक समाजाचे चित्रण अधोरेखित करतो तर अध्यापक समाजाचे सर्व प्रश्न समजून घेऊन येणाऱ्या नवीन पिढीला (विद्यार्थ्यांना ) दिशा दाखवण्याचे काम करतो. अध्यापकाचे मुख्य कार्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सखोल अभ्यास करून शेतकऱ्याच्या उन्नतीचा सुस्कार मार्ग समाजापुढे ठेवून शेतकऱ्यांच्या १८ आत्महत्या रोखल्या पाहिजेत. समाजाने अध्यापकावर फार मोठी जबाबदारी दिली आहे. या जावबदारीची पुर्तता संबंधीत अध्यापकाने केली पाहिजे. ज्या देशाचा अध्यापक हा शेतकऱ्याचा प्रश्नावर जागरूक राहून येणाऱ्या नवीन पिढीला (विद्यार्थ्यांना ) मार्गदर्शन करेल त्या देशाचा विकास हा निश्चित आहे असे ही मत मांडले त्यानंतर बिजभाषक सुप्रसिद्ध साहित्यीक सौ मधु कांकरिया यांनी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन सावकारी आणि बॅक कर्ज, नापीक यामुळे शेतकर्याच्या आत्महत्या झाल्याचे नमुद करत शेतकर्याच्या वास्तववादी जिवनाचे वर्णन आपल्या बिजभाषणातून मांडून सहभागी प्राध्यापकाची मने हेलावून किसान विमर्श यावर संशोधन करून उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याचे अभ्यासपूर्ण व्याख्यानातून व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना शितला प्रसाद दुबे यांनी शेतकर्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि आर्थिक स्थिती बाबत चिंता व्यक्त केली या उद्घाटन सञाचे सुत्रसंचलन प्रा .डॉ पल्लवी पाटील व डॉ. संतोष पवार तर आभार प्रदर्शन डॉ विरनाथ हुमनाबादे यांनी केले. यावेळी अनेक प्राध्यापकांनी उपस्थिती लावली होती. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी आयोजक प्राचार्य डॉ बबनराव बोडके, शिक्षण संस्थेच्या सदस्या लताताई मोरे सह संयोजक डॉ वीरनाथ हुमनाबादे, डॉ संतोष पवार, प्रा ज्ञानेश्वर बोडके, उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण, नँक समन्वयक डॉ प्रभाकर स्वामी, डॉ भारत भदाडे, प्रा बालाजी आचार्य, प्रा संजय जगताप, डॉ बळीराम पवार, प्रा पांडुरंग कांबळे डॉ सदाशिव वरवटे, डॉ अनंत सोमवंशी डॉ दर्शना कानवटे, प्रा पद्मजा हगदळे, डॉ चेतन मुंडे, प्रा विक्रम गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक गोपाळ इंद्राळे उद्धवराव जाधव, अनिल भदाडे किशन धरणे, अखिल शेख शिवाजी हुंबाड आदिनी परिश्रम घेतले.
News today 24 असलम शेख लातुर,