मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिजाई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जिजाऊ इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती पूजन करुन थोर समाजसेवकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुभाष सुर्यवंशी हे होते. जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये वर्षभरात विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या असता या स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे वर्षभर संस्थेत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा तसेच कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, तसेच मराठमोळी गाणे, समाज प्रबोधनपर नाट्य येथील स्कूलच्या बालकलाकारांनी सादर केली. या कार्यक्रमात बाल कलाकारांनी विविध प्रकारच्या वेशभूषा व फॅन्सी ड्रेस परिधान केल्याने उपस्थितांची मन आकर्षित केले जात होते. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे आष्टीचे अध्यक्ष सुनिल रेडेकर, भाजपचे संपत बावडकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ.चंद्रकांत कोरडे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, तानाजी पिसे, विकास कटारिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे सर, सचिव शर्मिला शिंदे, क्रिश शिंदे, प्राचार्या उर्मिला त्र्यंबके, शिक्षिका सरिता लाढाणे, सुरेखा शेलार, प्रतिक्षा उल्हारे, निकिता मालवदे, आशा पवार, दत्तू सकट आदींसह विद्यार्थी- विद्यार्थीनी पालक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…यावेळी सचिव सौ.शर्मिला केशव शिंदे यांनी संस्थेचा वार्षिक अहवालाचा लेखाजोखा मांडला..
प्रतिनिधी महंमद पठाण सह नय्युम पठाण कर्जत