त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली? नीलेश लंकेंची खोचक टीका.
भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी (ता. १८) पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर जाहीर माफीनामा सादर केला. यंदा निवडणुकीचा तिकीट मला जरी मिळालं असलं, तरी गेला ५ वर्षाचा काळ हा खडतर काळ होता, या काळात कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो, असं सुजय विखेंनी म्हटलं. त्यांच्या या माफीनाम्यामुळे सर्वच अवाक् झाले
अशातच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विखेंच्या या माफीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ येत आहे. याचा अर्थ तुमचा राजकीय स्वार्थ भागला आहे. आता परत तुम्ही आहे त्या स्थितीत कार्यकर्त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणार आहात”, अशी टीका नीलेश लंके यांनी केली आहे. “माझे सुज्ञ नागरिकांना सांगणे आहे की, ही माफी फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असून आपला स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्याशिवाय सोडत नसतात. हा प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण असतो. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, असेही निलेश लंके म्हणाले आहेत.