देव तारी त्याला कोण मारी कुपनलिकेत अडकलेल्या बालकास वाचवण्यात यश
सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या इंडी तालुक्यातील लच्याण गावातील शेतातील कूपनलिकेत पडलेल्या सात्विक या दोन वर्षीय बालकाला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तब्बल वीस तास चाललेल्या बचाव कार्यानंतर बाळाची सुटका करण्यात आली. मुलाचे पालक सतीश मुजगौंडा व पूजा आणि स्थानिकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सात्विकला जिवंत बाहेर काढण्यात अखेर बचाव दलाला यश आले. वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सात्विकला तात्काळ रुग्ण वाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. एनडीआरफच्या पथकाने बचाव कार्य केले. त्याला बेळगाव येथील श्रीशैल चौगुला याच्या नेतृत्वाखालील राजा आपत्ती व्यवस्थापन दल (एसडीआरएफ) , स्थानिक पोलीस आणि अग्निशामन दलाच्या जवानांनी मदत केली. बचाओ कार्य अंतिम टप्प्यात आल्यानंतर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. बालकाला खूप कूपनलिकेतून बाहेर काढताच त्याला प्राथमिक उपचार करून रुग्णालयात नेण्यात आले. बचाव कार्यात अंतिम टप्प्यात कर्मचाऱ्यांना मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला होता. त्यामुळे बचाव पथकाचा उत्साह वाढला आणि त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढविला. अखेर सात्विक ला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी टी.भूबालन, जिल्हा पोलीस प्रमुख हषिकेश सोनावणे व इतर अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते.
प्रतिनिधी शिवराज मुगळे