Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»उसने दिलेले पैसे परत मागितल्याने लोखंडी रॉडने मारहाण.
    Ahmednagar

    उसने दिलेले पैसे परत मागितल्याने लोखंडी रॉडने मारहाण.

    newstoday24By newstoday24April 16, 2024Updated:April 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उसने दिलेले पैसे परत मागितल्याने लोखंडी रॉडने मारहाण.

    तिघा जणांवर गुन्हा दाखल.

    नगर – उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तिघांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आगरकर मळ्यात घडली आहे. या प्रकरणी तिघाजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत आदित्य संजय शिदोरे (वय ३२, रा. जिल्हा परिषद कॉलनी, आगरकर मळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिदोरे यांनी आरोपी हितेश अजय बोरा यांना पैसे दिलेले होते. ते त्यांनी परत मागितले असता १० एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हितेश बोरा व त्याच्या सोबत असलेल्या २ अनोळखी इसमांनी शिदोरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
    तसेच हातातील लोखंडी रॉडने मारहाण करत जबर जखमी केले. या मारहाणीत जखमी झालेल्या शिदोरे यांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी (दि.१४) पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी हितेश बोरा व २ अनोळखी इसमाच्या विरोधात भा.दं.वि.कलम २२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

    #Ahmednagar #breaking #crime #police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleबागडपट्टी शेरकर गल्ली येथे मराठा समाज पंचाचे तालीम पंचमंडळ व हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने श्री हनुमान व गणपती प्राणप्रतिष्ठापना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न
    Next Article नगर अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.