Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»
    Maharashtra

    newstoday24By newstoday24May 23, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ओंकार रापतवारचा रंगरेजा जगभरातील रसिकांना भुरळ घालणार

    आफ्रिका खंडातील साउथ वेस्ट तसेच इथोपिया टांझानिया इत्यादी देशात सलग चार महिने ओंकारचे लाईव्ह कॉन्सर्ट

    अंबाजोगाई करांसाठी प्रचंड अभिमानाचा क्षण

    (अंबाजोगाई ) अंबाजोगाईला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि हीच ओळख कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीतील युवा संगीतकार ओंकार रापतवार याने आपल्या कलेचा आविष्कार जगभरामध्ये पोहोचवून अंबाजोगाईकरांना सुखद अभिमानाचा क्षण निर्माण करून दिला आहेअत्यंत कमी वयात आणि वेळेत एकाच वेळी अनेक वाद्य वाजवणारा, अत्यंत कमी वयात काही वर्षांपुर्वी “दि रेन” हा स्वत:चा संगीत अलबम काढून आपले सांगितीक करीयर सुरुवात करुन आंध्रप्रदेशातील दोन चित्रपटांना पार्श्वसंगीत देवून आंध्रचित्रपट सृष्टीत स्वतःची नवी ओळख निर्माण करणारा, मराठवाड्यातील अनेक नवोदित गायकांच्या गाण्यांना संगीतबद्ध करून प्रसिध्दीच्या झोतात आलेला ओंकार आता परदेशातील रसिकांना मोहित करण्यासाठी जातोय. संगीत साहित्य क्रीडा या क्षेत्रामध्ये अंबाजोगाईकरांनी आपला स्वतंत्र ठसा निर्माण केलेलाच आहे. परंतु या सर्वांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा युवा संगीतकार ओंकार हा आगळावेगळाच म्हणावा लागेल. शास्त्रीय तबलावादनापासून आपल्या अध्ययनाला सुरुवात करणाऱ्या ओंकारने आज उत्तम कंपोजर आणि जगभरातील विख्यात गायकांना साथसंगत करणारा ड्रमर अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2024 या चार महिन्याच्या कालावधीमध्ये ओंकारच्या रंगरेजा हा ग्रुप तांझानिया इथोपिया तसेच आफ्रिका खंडातील साउथ आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये आपला कलाविष्कार सादर करून जगभरातील रसिकांना भुरळ घालणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रंगरेजा ग्रुप इंडियन क्लासिकल, सुफी सॉंग, वेस्टर्न फ्युजन, सोलो ,बॉलीवूड सॉंग त्याचबरोबर पाश्चात्य संगीत रसिकांसाठी इंग्लिश सॉंगही सादर करणार आहे. ओंकारच्या नेतृत्वाखाली परदेशवारीवर निघालेल्या या रंगरेजा ग्रुपमध्ये रणबीर सिंग – गिटार, भैरवी पाटील – शास्त्रीय गायिका , सौरभ – बासरी ,शाकीब – बेस गिटार यांची साथसंगत लाभणार आहे. सध्या नवीन पिढीमध्ये अनेक युवा संगीतकार नावारूपाला येत आहेत, प्रत्येकाची काही ना काही तरी वेगळी खासियत आहे. परंतु या प्रचंड स्पर्धेमध्येसुद्धा ओंकारने आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. स्वतः संगीतकार आणि उत्तम कलावंत म्हणून प्रसिद्धीच्या वलयात असतानाच आपल्या कलेचा लाभ येणाऱ्या भावी पिढीला व्हावा यासाठी त्याने अंबाजोगाई मध्ये सत्येंदू फाउंडेशन संचलित बॉम् म्युझिक स्कूलची उभारणी केलेली असून या माध्यमातून शास्त्रीय उपशास्त्रीय पाश्चात्य लोकसंगीत या सर्वच कला प्रकारातील बारकावे लक्षात घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवले जात आहे. ओंकारचा कलावंत म्हणून सादरीकरणासाठी हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यामध्ये हजारो पाश्चात्य रसिकांसमोर ओंकारला आपली कला सादर करण्याची उत्तम संधी या माध्यमातून मिळालेली आहे आणि हा फक्त ओंकारसाठीच नव्हे तर पूर्ण अंबाजोगाईकरांसाठी प्रचंड अभिमानाचा क्षण आहे. ओंकारणे याच पद्धतीने कलाक्षेत्रामध्ये यशाची शिखरे पदाकांत करावीत यासाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    यापूर्वीही अनेक कलावंतांनी सादरीकरणासाठी परदेश वाऱ्या केलेल्याच आहेत परंतु ओंकार आपल्या रंगरेजा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लाखो पाश्चात्य रसिकांसमोर फक्त कलाच सादर करणार आहे असं नव्हे तर त्याची ज्या पद्धतीने जडणघडण झाली आहे त्या पद्धतीने तो तेथील लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल हे नक्की. आणि एक गुरु म्हणून या लाडक्या शिष्याचा मला सार्थ अभिमानाचा आहे.
    गुरू तालमार्तंड प्रकाश बोरगावकर

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअंबाजोगाई तालुक्यात शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पूर्ण करून डोनेशन घेणाऱ्या शाळेवर कारवाई करा
    Next Article वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी ठार
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.