Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी ठार
    Ahmednagar

    वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी ठार

    newstoday24By newstoday24May 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी ठार

    वरवंडीच्या माजी सरपंचाच्या मुलीचा बिबट्याने नरडीचा घोट घेतला

    नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची वनविभागाकडे मागणी

    राहुरी :  तालुक्यातील वरवंडी येथिल शेतकरी कुटुंबातील चार वर्षाची वेदिका श्रीकांत ढगे हि घरासमोरील अंगणात खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक वेदिकावर झडप मारली. हल्ला करून जखमी केले वेदिकेला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.परंतू उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे येथिल डाॅक्टरानी घोषित केले आहे.हि घटना वरवंडी गावाचे माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांच्या वस्तीवर घडली . याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वरवंडी येथिल माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे या शेतकरी कुटुंबातील चार वर्षीय मुलगी वेदिका श्रीकांत ढगे सकाळी पावणे आठच्या सुमारास अंगणात खेळत होती.गिन्नी गवतात बिबट्या दबा धरुन बसलेला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्याने पलायन केले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. कुटुंबीयांनी व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले.उपचारापुर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला . राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी व वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे , वनरक्षक सतीश जाधव , गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .राहुरी तालुक्यातील कृषिविद्यापीठ, मुळानगर, बाभुळगाव,बारागाव नांदुर, आदि भागांत मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे. शेजारील राहता, श्रीरामपूर तालुक्यात मानवी  वस्त्यांवर  बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे. वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्याचे हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने ग्रामीण वरवंडी परिसरात शोककळा पसरली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे तसेच या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.वरवंडी भागात नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी  पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

    News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticlePrevious Post
    Next Article बुद्ध पौर्णिमा निमित्त आंबोडीवेस आकोट येथे समाज मंदिराचे उदघाटन आकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माळवे यांच्या हस्ते.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.