Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून काॅलेज तरुणीची आत्महत्या.
    Maharashtra

    रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून काॅलेज तरुणीची आत्महत्या.

    newstoday24By newstoday24July 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून काॅलेज तरुणीची आत्महत्या.

    दोन अल्पवयीन रोडरोमिओंवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गून्हा दाखल करून ताब्यात घेतले.बाल सुधारगृहात रवानगी

    राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील एका काॅलेज तरुणीने दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमीओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या आईने केला.देवळाली प्रवरा येथिल अल्पवयीन दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
    या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हीने नुकतेच ११ वीच्या वर्गात प्रवेश घेऊन काॅलेजचे शिक्षण सुरु केले होते. जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोडरोमिओ तीची छेडछाड करीत होते. याबाबत तीने तीच्या आईला सांगीतले. त्यावेळी तीच्या आईने सदर रोडरोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड करु नका, तीला त्रास देऊ नका, तीला परत फोन करु नका. अशी त्या रोडरोमिओंना समज दिली होती. त्यानंतरही रोडरोमिओं कडून तीची छेडछाड सुरुच होती. जागृती ही रोडरोमिओंच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळून गेली होती. दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. नंतर तीने तालूक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्या जवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. रेल्वेच्या धडकेने जागृती हिच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
    जागृती या तरुणीची आई सुरेखा विश्वास शिंदे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहुन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील दोन साडे सतरा वय असलेल्या दोघांवर गून्हा रजि. नं. ८०३ /२०२४ भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गून्हा दाखल करण्यात आला. गून्हा दाखल होताच राहुरी पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहे.

    News Today साठी राजेंद्र उंडे राहुरी

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleदुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत…
    Next Article जुन्या वादातून युवकाची निघृण हत्या
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.