अहमदनगर : मुकुंदनगरचा विकास आराखडा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर
मुकुंद नगरच्या महापालिकेच्या राखीव जागेवर क्रीडांगण उद्यान सह जॉगिंग पार्क करण्यासाठी निधी देण्याची मागणी- माजी नगरसेवक फैयाज शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- उपनगर असलेल्या मुकुंद नगर येथे क्रीडांगण जॉगिंग पार्क नसून नागरिकांना फिरण्यासाठी व युवकांना खेळण्यासाठी महापालिकेच्या राखीव जागेवर क्रीडांगण व उद्यानसह जॉगिंग पार्क उभारून देण्यासाठी माझी नगरसेवक फैयाज शेख केबलवाला यांनी या बाबतचा प्रस्ताव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आले. मुकुंदनगर येथे फैयाज शेख मित्र मंडळाच्या वतीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाच्या राखीव जागेवर वृक्षरोपण करून सुशोभीकरण करण्यात आलेले असून वृक्ष संवर्धन म्हणून ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा सुंदर मुकुंदनगर शहर बनवण्याच्या हेतूने या महापालिकेच्या राखीव जागेवर क्रीडांगण उभारण्यासाठी जिल्हा विकास निधी अंतर्गत येथे क्रीडांगण निवास उद्यान जॉगिंग पार्क, आधी करण्यासाठी निधी देण्याबाबत माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करून चर्चा केली. याबाबत जल्द कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले याबाबत मुकुंद नगर येथील नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्याकरिता व युवक हा मैदान उपलब्ध नसल्याने व्यसनधीन होत असून मैदानाची व्यवस्था करून लवकरात लवकर युवकांना मैदान उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक फैयाज शेख यांनी सांगितले यावेळी म लक्ष्मी ट्रान्सपोर्टचे वसीम खान ,,दर्गादायरा येथिल नियाज सय्यद आदी उपस्थित होते