अहमदनगर ब्रेकिंग : खून करून पसार झालेला आरोपी पोलिसांनी पकडला
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ जुलै):-खुन करुन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे.दि.23 जुन रोजी सुपा शासकीय विश्रामगृह जवळील ओढ्यात पुरुष जातीचा एक बेबारस मृतदेह सापडल्याने सुपा पो.स्टे.आकस्मात मृत्यु गुन्हा रजी नं 31/2023 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. मयताचे डोक्यावर चेहऱ्यावर जखमा असल्याने त्याचा खुन झाला असावा असा पोलीसांचा अंदाज होता. मयताचे अंगावर तसेच खिश्यामध्ये कोणताही ओळखीचा पुरावा आरोपीने ठेवला नसल्याने त्याची ओळख पटविणे पोलीसां समोर आव्हान होते.खुनाच्या दृश्टीकोनातुन तपास करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले होते.सदर आ.मृचे तपासात असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदर अनोळखी मयत हा सुपा परिसरातील हॉटेल मध्ये वेटर म्हणुन काम करत आहे.अशी बातमी मिळाल्याने सुपा परिसरातील सर्व हॉटेल मध्ये शोध घेतला असता सुपा येथील एका हॉटेल मध्ये मयत हा वेटर म्हणुन कामास होता. सदर वेटरची अधिक माहीती घेतली असता तो त्याचे नाव खंडु रघुनाथ औटी (वय-24 रा. पाडळी आळे ता.पारनेर) येथील असल्याचे समजल्याने सदर मयताचे फोटो त्याचे नातेवाईकांना दाखवुन त्याची ओळख पटवुन सदर मयत हा दि.18/06/2023 पासुन संपर्कात नसल्याचे नातेवाईकांनी कळविले. दरम्यान त्याच हॉटेल मधील आणखी एक वेटर घटना घडल्यापासुन कामावर आला नाही.असे हॉटेल मालकाने सांगितले.त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने पोलीसांनी हॉटेल मालकास त्याचे नाव गाव विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव सचिन जाधव असे असुन तो कोठे राहतो याबाबत काही एक माहीत नाही असे सांगितले.त्याचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या वेटर कडुन प्राप्त करुन त्याचे लोकेशन घेवून त्यास ताब्यात घेतले असुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण पुंडलिक गोलाईत वय-34 रा.म्हशीकोठा ता. सोयगाव जि.छञपती संभाजी नगर असे असल्याचे सांगितले.त्यामुळे सदर आरोपी हा खोटे नाव सांगुन हॉटेल मध्ये काम करत होता. हे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपी याने दारु पिऊन दारुच्या नशेत मयताचे डोक्यात लोखंडी पाईप मारुन खुन केल्याची कबुली दिली आहे.सदर मयताचे पी.एम नोट्स प्राप्त करुन सुपा पो.स्टे गु.र.नं.298/2023 भा.द.वि.कलम 302,177 प्रमाणे गुन्हा रजी.करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी न.ग्रा.वि.अ.नगर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री ज्योती गडकरी,पोसई/तुकाराम पवार,पोसई/अख्तर पठाण,पोहेकॉ/खंडेराव शिंदे , पोहेकॉ/संदीप चौधरी,पोना/ यशवंत ठोंबरे,पोना/संदीप पवार यांनी केली आहे.