Special report | Crime | अहमदनगर : नागरिक त्रस्त ; वाहतूक पोलीस हफ्ते घेण्यात व्यस्त
कायदेशीर कारवाईपेक्षा बेकायदेशीर कारवाईस वाहतूक शाखेचे पोलिस देताहेत प्राधान्य
अशीच कारवाई चालू राहिल्यास नगर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडणार हे नक्की..
नगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस वर्दीचा करताहेत गैरवापर… हे कितपत योग्य
वाहन चालकाने दिलेली चिरीमिरी वाहतूक शाखेचे पोलिस घालतात स्वतःच्या खिशात
वाहतूक कोंडी सुरळीत करणे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी कार्य करण्याची मोठी जबाबदारी वाहतूक शाखेच्या पोलिसांची असते, अहमदनगर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कार्यरत आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर हे पोलीस दंडात्मक कारवाई देखील करतात मात्र यातील काही पोलीस हे आपल्या वर्दीचा गैरवापर करत असल्याचा प्रकार या अहमदनगर शहरात समोर येत आहे, वाहन चालवताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंडात्मक रक्क्र्म वसूल केली जाते मात्र काही वाहनचालक इतकी मोठी दंडात्मक रक्क्र्म भरू शकत नसल्याने तडजोड करत या पोलिसाना थोडीफार चिरीमिरी देत आपल्या वाहनावरील कारवाई टाळत आहे पोलीस देखील या अशा वाहनचालकांकडून चिरीमिरी घेतात आणि ते वाहन कारवाई न करता सोडून देतात आणि वाहन चालकाने दिलेली चिरीमिरी हे वाहतूक शाखेचे पोलिस मात्र स्वतःच्या खिशात घालत असल्याचे देखील प्रकार या नगर शहरात होत आहेत, इतकेच नव्हे तर शहरातून होणारी अवैध वाहतूक बंद करणे अवैध वाहतूकीवर कारवाई करणे गरजेचे असताना नगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस हे अशा अवैध वाहन चालकांशी आर्थिक हितसंबंध ठेवत कारवाई टाळत आहे, अहमदनगर शहरात अवैध वाहतूक चालू राहावी यासाठी अवैध वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून नगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस कायम स्वरूपी हप्ते घेतात आणि अशा या वाहनचालकांना पुढे वळण चालवण्यासाठी परवानगी देत आहे, हा प्रकार पुराव्यानिशी सिद्ध होत आहे, कारण या संदर्भातील एक महत्वाची ऑडीओ क्लीप news today 24 च्या हाती लागली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता स्वत:च्या फायद्यासाठी वाहन चालकांकडून बेकायदेशीर वसुली करत नगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस वाहन चालकांची आर्थिक लयलूट करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आणि वाहतुकीचे नियम मोडल्यावर मोठी दंडात्मक कारवाई होवू नये म्हणून हे वाहन चालक देखील चिरीमिरी देत आणि अवैध वाहतुकीस तसेच जड वाहतुकीस देखील आपल्याला परवानगी मिळावी यासाठी अनेक अवैध वाहन चालक हे पोलिसांना हफ्ते देत आपले वाहन कारवाई होण्यापासून वाचवत असल्याचे गैरप्रकार होत आहे. नगर शहर वाहतूक शाखेच्या अशा या गैर कृत्यामुळे तसेच वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलीस हफ्ते घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र या नगर शहरात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कायदेशीर कारवाई पेक्षा बेकायदेशीर कारवाई करण्यास नगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस प्राधान्य देत असल्याचे यावरून दिसून येत आहे, जर ही कारवाई अशीच चालू राहिली तर नगर शाःरातील वाहतूक व्यवस्था कोलमडणार हे मात्र नक्की..