सावेडी बालिकाश्रम रोड परिसरातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी योजने अंतर्गत विविध योजने बाबतची माहिती कॅम्पचा शुभारंभ संपन्न.
शासनाच्या योजना घरोघरी घेऊन जाण्याचे काम करू – मा.महापौर बाबासाहेब वाकळे
नगर – केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे घरोघरी घेऊन जाण्याचे काम सुरू आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी योजने अंतर्गत विविध योजना कार्यानुत आहे. योजना कागदावर न राहता त्याचा लाभ जनतेला होणे गरजेचे आहे. याचबरोबर नागरिकांना शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये जावे लागते मात्र शासन आपल्या दारी योजने अंतर्गत नागरिकांपर्यंत योजना घेऊन जाण्याचे काम होत आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणार आहे. तसेच वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. शासन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनात समाधान निर्माण झाला पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केले आहे. त्या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेला होण्यासाठी सर्वांनी काम करावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम होणार आहे. या योजनांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे. संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ निराधार योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहे. असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
सावेडी बालिकाश्रम रोड भुतकरवाडी बोरुडे मळा येथे शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत विविध योजना बाबतची माहिती कॅम्पचे चे उद्घाटन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका वंदनाताई ताठे, तहसीलदार संजय शिंदे, अन्नपुरवठा अधिकारी अर्चना भाकड, गीता गिल्डा, कालिंदी केसकर, पंकज जागीरदार, विलास ताठे, पुष्कर कुलकर्णी, अदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक रवींद्र बारस्कर म्हणाले की शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत नागरिकांना खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे. नागरिकांना आता शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. या योजनेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याचे काम होणार आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना देखील लागणारे दाखले तातडीने उपलब्ध केले जातील. असे ते म्हणाले
नगरसेविका वंदनाताई ताठे म्हणाले की शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने महिलांना जास्त फायदा होणार आहे. त्यांना घरबसल्या शासनाच्या योजनांची माहिती मिळणार आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागरिकांना मदतीचा दिला आहे. असे ते म्हणाले
पुरवठा अधिकारी अर्चना भाकड म्हणाल्या की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध योजना नागरिकांपर्यंत जाण्यासाठी शासन आपल्या दारी अभियानसुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. तरी नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. असे ते म्हणाले
तहसीलदार संजय शिंदे म्हणाले की शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये योजनेबाबतची जनजागृती होऊन लाभ मिळण्यास मदत होईल. या अभियानामुळे नागरिकांना तातडीने योजना वितरित केल्या जातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन जाण्याचे काम आम्ही सर्वजण मिळून करू. असे ते म्हणाले