अहमदनगर : मा.मनपा स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
बोल्हेगाव परिसरात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
नगर – बोल्हेगाव-नागपूर च्या विकासाला खऱ्या अर्थाने नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी चालना दिली आहे. ग्रामीण भागाला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुराव्याची खरी आवश्यकता असते, ते काम नगरसेवक कुमारसिंह वाकळे प्रामाणिकपणे करत आहे. जनतेशी संवाद ठेवून केलेली विकास कामे मनाला आनंद देत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व प्रेरणा अंगीकारून नगरसेवक कुमारसिंह वाकळे हे रायगड संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली जाईल संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी मदत होईल नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकास कामांना गती दिली आहे. बोल्हेगाव-नागपूर परिसरामध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये नागरिक वसाहती झपाट्याने वाढत आहे बोल्हेगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नगरसेवक कुमारसिंह वाकळे हे सर्वांना बरोबर घेऊन करीत असलेले विकासाचे काम कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
बोल्हेगाव गावठाण येथे मा.मनपा स्थायी समितीसभापती कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड संपर्क कार्यालयाचे व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बबनराव वाकळे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेवक स्वप्नील शिंदे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार,संभाजी पवार आदींसह स्वर्गीय विशालभाऊ वाकळे पाटील मित्र मंडळ, बोल्हेगाव नागापुर ग्रामस्थ,वडीलधारे नागरिक तरुण वर्ग उपस्थित होते.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की प्रभागातील जनतेने टाकलेल्या विश्वासामुळेच विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करू शकलो आहे. विकासाच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान लाभत आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरच सावडी-बोल्हेगाव सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागणार आहे. बोल्हेगाव परिसरामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याची विकास कामे मार्गी लागत आहे. बोल्हेगाव गावठाण रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. त्याचबरोबर प्रभागातील ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी लवकरच बोल्हेगाव येथे आरोग्य केंद्र सुरू होणार आहे. रायगड संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांबरोबरच विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांना बरोबर घेऊन प्रभागाच्या विकासाला चालना देऊ असे ते म्हणाले.
मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की नगरसेवक कुमार सिंह वाकळे प्रभागातील जनतेशी थेट संपर्क ठेवून काम करत आहे. त्यामुळेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांमध्ये जनतेशी दररोज संपर्क ठेवणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. असे ते म्हणाले