अहमदनगर : जमिनीच्या वादातून मारहाण करणा-यांना भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अटक
अहमदनगर प्रतिनिधी : नगर तालुक्यातील निंबोडी गावात जमीनीचे वादातून मारहाण करणा-यांना भिंगार कॅम्प पोलीसांनी अटक केली आहे.भोसले व भिंगारदिवे या कुटुंबामध्ये जमीनीच्या वादावरून न्यायालयात वाद चालू असून दि.03/06/2023 रोजी रात्री 10/00 वा.सुमा.झालेल्या भांडणामधून परस्पर विरोधी गु.र.नं.337/2023 भादवि कलम 326,324 वगैरे व गु.र.नं.338/2023 भादवि कलम 327,452,324,323, 504,506,143,147,148, 149 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुरनं 337/2023 मधील आरोपी नामे१)शैलेश रामदास भोसले २)सुरज जगन्नाथ शिंदे वय 39 वर्षे व गुरनं 338/2023 मधील आरोपी नामे १)संदिप उर्फ कुशाभाऊ पोपट भिंगारदिवे वय 45 वर्षे २)संतोष लहानू भिंगारदिवे वय 45 वर्षे ३) किरण मनोहर भिंगारदिवे वय 27 वर्षे ४)दत्तात्रय शंकर भिंगारदिवे वय 38 वर्षे सर्व रा.निंबोडी ता.जि.अहमदनगर अशांना तात्काळ अटक केली असून मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने अटक आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे, पोसई/मंगेश बेंडकोळी,सफो/बाबासाहेब अकोलकर, पोहकाँ/गणेश नागगोजे,सफौ/कैलास सोनार,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकाँ/संदिप घोडके,पोना/राहुल द्वारके,पोना/दिलीप शिंदे यांनी केली आहे