महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराच्या राजकीय नाटयमय घडामोडी घडल्यानंतर राज्यात शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन झाले यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीला राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी पाठींबा दर्शवत अजित पवार गटात हे आमदार सामिल झाले अजित पवार, उपमुख्यमंत्री झाले, पण आता राज्यातील मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले असून या महाराष्ट्र राज्यातील सत्तेत बदल घडवून आणव्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे अ.नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची मंत्री मंडळात वर्णी लागणारच असा विश्वास अनेक जण व्यक्त करताहेत आ. संग्राम जगताप यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार असल्याच्या चर्चेला उधाण झाले, त्यातच मंत्री मंडळाचा हा विस्तार उद्याच होणार असल्याची शक्यता असून आ. संग्राम जगताप यांचा त्यात समावेश होणार आणि ते मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची कुजबुज सध्या त्यांचे कार्यकर्ते आणि नगरकर, तसेच राजकीय मंडळी यांच्यात सुरू आहे. तरी आता मंत्री पदाबाबत आ. संग्राम जगताप इच्छुक असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होते की त्यांच्या इच्छेवर पाणी फिरते है पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अहमदनगर : राजकीय भूकंप : आमदार संग्राम जगताप उद्या मंत्री पदाची शपथ घेणार…
Related Posts
Add A Comment