अहमदनगर ब्रेकिंग : हद्दपार टोळीप्रमुख अतिक कुरेशी यास आॅपरेशनसाठी सवलत
श्रीगोंदा येथील हद्दपार टोळीतील टोळीप्रमुख अतिक गुलामहुशेन कुरशी याचे प्रतिबंधीत क्षेत्रात दवाखान्यात आॅपरेशनसाठी १४ ते १८ जुलै प्रवेशाबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सवलत दिली. यासाठी अॅड अयाज बेग व अॅड. सलमान जी. जहागिरदार यांनी काम पाहिले.
याबाबत हकीगत अशी की कुरेशी याचा आॅपरेशनसाठी परवानगीचा दि. १२ जुलै रोजी दिलेला अर्ज
असा की टोळी प्रमुख अतिक गुलामहुशेन कुरेशी, वय ३३ वर्षे, रा. खाटीक, गल्ली यास डॉ. जाहीद सईद शेख, अहमदनगर यांनी दि.१० जुलै २०२३ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार दि. १३ जुलै २०२३ पासून ३ ते ४ दिवस ऑपरेशनसाठी दवाखान्यात अॅडमिट होण्यासाठी अहमदनगर जिल्हयात प्रवेश करण्यास परवानगी मागीतली त्यानुसार हदपार टोळी प्रमुख अतिक गुलामहुशेन कुरेशी, रा. खाटीकगल्ली, श्रीगोंदा यास डॉ. जाहीद सईद शेख, यांचे किंग्ज रोड, रामचंद्र खुंट, अहमदनगर येथील हॉस्टिलमध्ये ऑपरेशनसाठी दि. १४ जुलै २०२३ ते दि. १८ जुलै २०२३ अशी चार दिवस अहमदनगर शहरात येण्याची परवानगी देण्यात यावी अ़शी मागणी करण्यात आली होती त्यावर दिलेल्या मुदतीत आपण आपले ऑपरेशन करुन घेवून तात्काळ जलद मार्गाने प्रतिबंधक क्षेत्रातून निघून जावे, असे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले आहे.
अतिक गुलामहुशेन कुरेशी, याच्यावरील योग्य त्या कारवाईसाठी: पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस स्टेशन जि. अहमदनगर यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.
आरोपी अतिक कुरेशी याच्या आॅपरेशनसाठी परवानगी मागण्यासाठी अॅड. अयाज बेग व अॅड. शेख सलमान जहागिरदार यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.