अहदमनगर : गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा आयशर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात…
एक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
अहदमनगर : दि. १३/०७/२०२३ रोजी १७.०० वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील केडगाव बायपास ते कल्याण रोडवर नेप्ती बायपास चौफुला येथे रोडवर अहमदनगर येथे काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्या करीता एका पांढरे रंगाच्या आयशर लेलंड मालवाहतुक गाडी मध्ये डांबून ठेवण्यात आलेली असुन आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस पथक हे बातमीतील नमुद ठिकाणी जावून पाहणी केली असता तेथे एक पांढरे रंगाचा मालवाहतुक आयशर लेलंड उभा असलेला दिसला त्याची पाहणी केली असता त्याचा क्रं MH३१ FC १९९० असा होता व त्या आयशरच्या पाठीमागील हौदयामध्ये एकुन १० जर्सी गाया काळया पांढ-या रंगाच्या एकून १,००,०००/- रु किमतीच्या व आयशर मालवाहतुक टेम्पो वाहन २,५०,०००/-रु असा एकुन ३,५०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला सदरच्या आयशर वाहना मध्ये ड्रायव्हर नामे सुनिल बाळासाहेब ब्राम्हणे वय २६ वर्ष धंदा वाहन चालक रा. झरेकाठी ता संगमनेर जि. अहमदनगर हा मिळुन आला व त्याने सांगीतले की, सदरची जनावरे ही माझ्याच मालकीची आहेत असे सांगीतल्याने सदरची जनावरे ही ताब्यात घेवुन सुरक्षेकरिता करीता पांजरपोळ या ठिकाणी सोडण्यात आली आहेत व आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ७६९/२०२३ महाराष्ट्र प्राणीरक्षा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब) ९ सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पोकॉ अमोल दिलीप गाढे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाच पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/विश्वास गाजरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ विश्वास गाजरे, पोहेकॉ गणेश थोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोना सलिम शेख, पोकॉ अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, पोकों सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे,सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.