Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»सुलताना चाँद बीबीच्या त्या शौर्याची जगाचे इतिहासकार दाखल घेतात पण अहमदनगरकरला विसर: असिफखान दुलेखान
    Ahmednagar

    सुलताना चाँद बीबीच्या त्या शौर्याची जगाचे इतिहासकार दाखल घेतात पण अहमदनगरकरला विसर: असिफखान दुलेखान

    newstoday24By newstoday24July 14, 2023No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर (प्रतिनिधी) 14 जुलै 2023: ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नव्हता अशा जगातील बलाढ्य इंग्रजसत्तेची मालकीन क्विन एलिझाबेथ. अहमदनगरच्या सत्ताधारी सुलताना चांदबिबी या समकालिन राज्यकर्त्या होत्या. जगात त्याकाळी मोजक्याच महिला सत्ताधारी होत्या. चांदबिबी यांचा मृत्यू झाला त्यावेळी मोगलांना त्यांच्या पायातील एक सँडल मिळाला. त्याची त्यावेळी किंमत तीन लाख रूपये होती. तो सँडल सध्या फ्रान्स येथील संग्रहालयात आहे. दोन्हींची किंमत एकूण सहा लाख रूपये होती आणि त्याचवेळी एलिझाबेथ राणीच्या मुकूटाची (ताज) किंमत चांदबिबी यांच्या सँडलच्या किंमतीपेक्षा फार कमी होती.असे अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुल्हेखान कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले.ते पुढे म्हणाले अहमदनगरचे वैभव असे भव्यदिव्य होते. त्याचबरोबर आपल्या भूमीने सर्व स्त्रीयांचा वेळोवेळी सन्मान व गौरव केलेला आहे. या भूमीत सुलताना चांदबिबी बरोबरच राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, शिक्षण प्रसारक मिसेस सिंथिया फेरार, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, हिराताई भापकर, जानकीबाई आपटे अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रीया होऊन गेल्या. या भूमीने येथे असलेल्या सर्व धर्मांचा आदर केलेला आपणास दिसून येत आहे. हिच आपली ‘गंगा जमुनी’ संस्कृती जगात प्रसिध्द आहे. तिचा सर्वत्र आदर केला जातो, असे गौरवोद्गार इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान यांनी काढले.

     

     

    औरंगाबादचे मरहूम डॉ. मिर्झा मोहम्मद खिज़र यांनी लिहलेल्या ‘सुलताना चांदबिबी’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ काल दि. १३ रोजी चांदबिबी यांच्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आला होता.
    रहेमत सुलतान हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन, प्राचार्य अब्दुल क़ादिर गुलाम शेख, प्रा. डॉ. अजिज अंबेकर, सय्यद बहार अंजुम, युनूसभाई तांबटकर, रैयान अली फारूक़ी, मिर्झा फैजानअली मोहम्मद खिज़र आदी मान्यवर उपस्थित होते.

     

     

    सुलताना चांदबिबी यांच्यावर लिहलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सय्यद बहार अंजुम यांनी डॉ. खिज़र यांच्या कार्याची माहिती दिली तसेच त्यांच्यासोबत केलेल्या ऐतिहासिक कार्याची ओळख करून दिली.

     

     

    ग्रंथप्रकाशन कार्यक्रमानंतर अहमदनगरचे अभिमान असलेले प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन यांना त्यांनी केलेल्या ऐतिहासिक, सामाजिक लिखाणाबद्दल अखंड अहमदनगरकरांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या गौरवपत्राचे वाचन प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.
    प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे गुबारे खातीर, डॉ. अल्लामा इक्बाल यांचे जर्बे कलिम, अहमदनगरचे अपर जिल्हाधिकारी खान मुन्शी अब्दुल कादिर यांचे तारीख-ए-अहमदनगर दक्कन यासह अनेक ग्रंथांचे भाषांतर करून सर्वसामान्यांना ज्ञान उघड करून दिले.

    कार्यक्रमास आनंद शितोळे, विवेक खोसे, प्रकाश झावरे, शेख शाकीर, संजय झिंजे, उबेद शेख, रविंद्र सातपुते, डॉ. सईद, ॲड. श्याम असावा, मुश्ताक सय्यद, आबिद शेख, शाकीर मामू शेख, मतीन सय्यद, वाहिद आंबेकर, भुषण देशमुख, प्रा. नवनाथ वाव्हळ, ॲड. गफ्फर शेख, वसीम सय्यद, साबीर अली, अतिक शेख, ॲड. हनिफ, अल्ताफ सय्यद, झैद सय्यद, अशोक सब्बन आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वितेसाठी आर्टलाईनचे सय्यद समी, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, सतीश सातपुते, संध्या मेढे, फिरोज शेख, सय्यद वसिम यांनी परिश्रम घेतले.
    यावेळी इतिहास वस्तु संकलक सचिन डागा यांच्या ‘अहमदनगरची नाणी’ हा चलन संग्रह इतिहास प्रेमींना पहाण्यासाठी ठेवला होता.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद वहाब यांनी प्रस्तावना शेवटी आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.

    #chandbibi
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleBreaking : ‘चांद्रयान -३’ ची अवकाशात ऐतिहासिक झेप; तर भारत चौथा देश ठरणार..
    Next Article अहमदनगर : विविध विकास कामाच्या माध्यमातून प्रभाग 11 चा होतोय कायापालट…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.