अहमदनगर : विविध विकास कामाच्या माध्यमातून प्रभाग 11 चा होतोय कायापालट…
विकास काय आहे ? विकास कामे कशाला म्हणतात हे नागरिकांनी २०१३ नंतर पाहिले..
अहमदनगर शहरातील प्रभाग 11 मध्ये बाबा बंगाली परिसरात आज्जू भाई घर ते आरिफ शेख यांच्या घरापर्यंत तसेच मागील गल्लीत पटेल हाजी साहब यांच्या घरापर्यंत गल्ली अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आलीये, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भा शेठ कुरेशी यांच्या हस्ते नारळ फोडून या रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर शहरातील प्रभाग 11 मध्ये झेंडीगेट भागातील बाबा बंगाली परिसरात रस्त्याचा मोठा प्रश्न आता मार्गी लागलाय. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या बिकट रस्त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असे, याबबत येथील नागरिकांनी ही समस्या मुजाहिद कुरेशी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर मुजाहिद कुरेशी यांनी तात्काळ या भागात रस्ता कॉंक्रीटीकरण कामाला सुरुवात करत नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला,
अहमदनगर शहरातील प्रभाग 11 मध्ये झेंडीगेट, बाबा बंगाली, धरती चौक, हातमपुरा, बेपारी मोहल्ला, या परिसरात २०१३ पूर्वी विकास कामे झालीच नाहीत, त्यामुळे विकास काय आहे ? विकास कामे कशाला म्हणतात हे येथील नागरिकांनी २०१३ नंतर पाहिले.. करणा या भागात २०१३ नंतर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली, आधी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवला त्यानंतर येथील ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लावला आणि आता रस्त्याची कामे हाती घेतली असून नागरिकांचे एक एक प्रश्न मार्गी लावत या प्रभागात विकास कामाच्या माध्यमातून कायापालट केला आहे. तसेच या भागात पाण्याची समस्या असेल किंवा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल अशा मुलभूत समस्या २०१३ नंतरच्या काळात मार्गी लागत असून त्यासाठी मुजाहिद कुरेशी सातत्याने पाठपुरावा करतात. तर येथील रस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी येथील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ भा सेठ कुरेशी यांनी प्रभाग 11 मधील विकास कामांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अहमदनगर शहरातील प्रभाग 11 मध्ये करण्यात रस्ता कॉंक्रीटीकरण कामाच्या शुभारंभावेळी नगरसेविका परवीन कुरेशी, अजमत इराणी, इकबाल बागवान, हसन शेख, केदारे मामा, अजगर अली, जहीर सय्यद, सागर भाऊ, रोहित केदारी, गालीब कुरेशी, शहेबाज सय्यद, इम्रान शेख, लतीफ तांबोळी, अभिषेक बुंदेले, कार्तिक चिपोले, जावेद तांबोळी, मारुफ सय्यद, सोनू अली, अल्ताफ कुरेशी, आसिफ क्लासिक रेडीऐटर, नज्जू कुरेशी, नाजीम कुरेशी, मंगला अंटी, रऊफ बाबा कुरेशी, वाहिद कुरेशी, गनीभाई, वाजीद इराणी, असद इराणी, गुड्डू शेख, वाहिद बाबा यांच्यासह परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.