अहमदनगर : शहरात सुरु असलेले नाले सफाईचे काम निकृष्ठ दर्जाचे – प्रशांत भाले
नाले सफाई चांगल्या पध्दतीने होण्यासाठी मनपा आयुक्तांना दिले निवेदन
अहमदनगर शहरात सध्या सुरु असलेले नाले सफाईचे काम निकृष्ठ दर्जाचे चालु असून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले यांनी अहमदनगर मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केलीये,
अहमदनगर महानगरपालिका कडून शहरात नाले सफाई ही पावसाळ्या पूर्वी सुरू करणे अपेक्षित असताना या वर्षी वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात मनपाकडून कमी प्रमाणात कामगारांद्वारे नाले सफाई होत आहे. सध्या चालु असलेली नाले सफाई ही उशिरा चालु झाल्याने महानगरपालिकेने पुर्ण क्षमतेने जास्तीचे मनुष्यबळ लावून लवकरात लवकर नाले सफाईचे काम करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे वॉर्डात चालु असलेली नाले सफाई करतांना त्या कामगारांवर कोणत्याही प्रकारे महानगर पालिका वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता विभागाचे अधिकारी सुपरवायझर यांचे लक्ष असल्यचे दिसुन येत नाही. त्यामुळे या कामात हलगर्जीपणा होवुन फक्त फोटो काढणे पुरते नाले सफाई होत आहे. तरी स्वच्छता विभाग व नियंत्रण अधिकारी यांच्या कडुन शहरातील नाले सफाई ही आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने करून घेणे आवश्यक आहे. शहरातील नाले सफाई व्यवस्थित न झाल्यास विविध भागात पाण्याचा साठा निर्माण होवुन नागरिकांच्या घरात पाणी शिरते व त्यामुळे नागरिकांचे वित्त व जिवित हानी होवु शकते. तरी महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालून नाले सफाई व्यवस्थित रित्या करून घेणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे याकामी हलगर्जीपणा झाल्यास तात्काळ संबंधित अधिकारी कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले यांनी अहमदनगर मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केलीये,