अहमदनगर ब्रेकिंग : गोवंशाची कत्तल करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केलं जेरबंद… अहमदनगर एलसीबीची मोठी कारवाई !
राकेश ओला, (पोलीस अधिक्षक, अहमदनगर) यांनी पोनि दिनेश आहेर, (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना अहमदनगर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमूद आदेशान्वये पोनि आहेर, (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांनी दिनांक 15/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतल्या पोसई/ सोपान गोरे, पोना/सचिन आडबल, संतोष लोढे, पोकॉ/शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, जालिंदर माने, सागर ससाणे, रोहित येमुल व अमृत आढाव यांना त्यांच्या दालनात बोलावून कळविले की, सोफीयान कुरेशी, (रा. व्यापारी मोहल्ला, अहमदनगर) हा एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जीवंत जनावरांना विना चारापाण्याचे डांबून ठेवून अमानुष वागणुक देत कत्तल करीत आहे. आता गेल्यास मिळून येईल.
पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थागुशा पथकाला पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले. या पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता व्यापारी मोहल्ला, अहमदनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम गोवंश जीवंत जनावरांची कत्तल करताना दिसले.
पथकाची खात्री पटताच अचानक 04.30 वा.चे सुमारास छापा टाकून तीन इसमांना जागीच ताब्यात घेतले. व पोलीसाची ओळख सांगून त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मोहम्मद कैफ अब्दुल मस्जित कुरेशी, वय 19, 2) अब्दुल आसीफ कुरेशी वय 19 व 3) शाहिद मुनाफ कुरेशी वय 21 सर्व (रा. ब्यापारी मोहल्ला, अहमदनगर) असे सांगितले.
त्यांच्याकडे सदर कत्तलखान्यात व गोवंश जनावरे या बाबत विचारपूस करता त्यांनी सदर कत्तलखाना इसम नामे 4) सोफियान अय्याज कुरेशी (रा. ब्यापारी मोहल्ला, अहमदनगर) (फरार) याचे मालकीचा असून तो चालवतो, असे सांगितले. त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून अहमदनगर एलसीबीच्या पथकाने 3, लाख 82,000/- रुपये किंमतीचे 1, हजार 910 किलो गोमास, 1 लाख 20,000/- चे अकरा (11) लहान मोठी जिवंत जनावरे व 500/- रुपये किंमतीचा सत्तुर व सुरा असा एकुण 5 लाख 02 हजार 500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे (नेमणूक – स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. 776/2023 म.प.सु.अ.चे कलम 5 (क), 9 (अ) सह प्रा.नि.वा.क. 3, 11 प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाई कोतवाली पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), प्रशांत खैरे, (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर), अनिल कातकाडे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर विभाग) यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.