अहमदनगर : नगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदे हा घटना घडल्या पासून फरार आहे, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहे, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना कधी अटक होणार ? पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार ? या प्रकरणाचा पोलीस कशा पद्धतीने तपास करणार ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे ? शहरात ओंकार भागानगरे खून प्रकरण ताजे असतानाच पुन्हा खुनाची घटना घडल्याने शहर हादरले असून नागरिक भयभीत झाले ? नगर शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे….
अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवक स्वप्नील शिंदेच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना…
Related Posts
Add A Comment