कर्जत :: प्रतिनिधी
कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयावर २-३ अज्ञातांनी शनिवारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात स्वतः आमदार रोहित दादा पवार यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत.. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे..
प्रतिनिधी महंमद पठाण सह नय्युम पठाण कर्जत तालुका