नगर – कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे सांगत संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्या कामांमध्ये देव शोधला. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी आहे त्या जागेवरूनच ज्ञान भक्ती सेवे मध्ये देव शोधावा, असे आवाहन ह भ प अजय महाराज बारस्कर यांनी केले.
संत शिरोमणी नामदेव महाराज व संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज संयुक्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सावेडी गावातील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये आयोजित काल्याच्या कीर्तनामध्ये ते बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, प्राचार्य विठ्ठल गुंड, अरुण आहेर, ह भप चंद्रकांत बारस्कर, गजानन वाकळे, महेश कराळे, दिगंबर भोसले, बाळासाहेब वाकळे आदीसह हभप देविदास आमटे, दत्तात्रय खांदवे, सिद्धनाथ महाराज मेटे, राजेंद्र उल्हारे, ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय राजगुरू, महादेव पठारे, जॉन पॅरिस आदी मंडळीने गायनासाठी सातसंगत केली.
अजय महाराज बारस्कर यांनी संत नामदेव महाराजांनी कीर्तनामधून ज्ञान सांगितले आणि नाचून आनंदी राहण्याचा उपदेश केला तर संत शिरोमणी सावता महाराज यांचे चरित्र सांगताना सावता महाराज हे उत्तम प्रकारचे डॉक्टर होते. त्या काळामध्ये ते वैद्यकीय सेवा करत असल्याचे पुरावे त्यांच्या चरित्रामध्ये आढळून येतात. बाराव्या शतकात महामारी आली होती या महामारीच्या काळामध्ये लोक भूतबाधा झाली म्हणून देवाला बोकडाचा बळी मला लागली चढवायला लागले त्यावेळी सावता महाराजांनी सांगितले की, बळी देऊन काही उपयोग होणार नाही. त्याऐवजी रुग्णांना आर्थिक मदत करा , औषधआलय स्थापन करा जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल ते औषध मी स्वतः बनवतो, असे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्याच्या गरिबीची, दारिद्र्याची कारणे ही सावता महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितले आहेत. अक्षरज्ञान नसणे अडाणी असणं, व्यसनी असणं आणि घरात भांडण असणे ही शेतकऱ्याच्या दारिद्र्याची कारणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्ञानी होणे गरजेचे आहे जे बाजारात विकत ते पिकवीणे गरजेचे सांगितले हा उपदेश सावता महाराजांनी सर्वच वारकरी शेतकऱ्यांना केला या सोहळ्यासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विशेष योगदान दिले.
चौकट
घरोघरीची भाकरी झाला काला
संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तनासाठी आलेल्या सर्व भाविकांना घरून येतानाच आपली शिदोरी आणण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरून येताना भाकरी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. कीर्तन झाल्यानंतर तो सगळा काला एकत्रित करून सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.
जॉन पॅरिसला विठ्ठल भावला
जॉन पॅरिस नावाचे साधक फ्रान्सवरून अवतार मेहेरबाबा यांच्या मेहराबाद येथे आले. त्यांना अभंग गायनाची ओढ लागली. त्यांनी नगरमध्ये गायनाचे क्लास लावले. आज त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आमुची मलियाची जात या अभंगावर सुंदर गायन केले. विठ्ठलाचा भाव प्रत्येकाला खेचून आणतो, याची प्रचिती जॉन पॅरिस यांनी गायलेला अभंग ऐकल्यानंतर आली.