Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»Ahmednagar breaking : अंकुश चत्तर खुन प्रकरणातील 7 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
    Ahmednagar

    Ahmednagar breaking : अंकुश चत्तर खुन प्रकरणातील 7 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

    newstoday24By newstoday24July 17, 2023No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अंकुश चत्तर खुन प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…

    प्र दिनांक 15/07/2023 रोजी आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाल्याने अंकुश चत्तर हा मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आला असता यातील 7 ते 8 आरोपी काळे रंगाचे कार मधुन येवुन पुर्ववैमनस्यातुन स्वप्निल शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. सदर घटने बाबत फिर्यादी श्री. बाळासाहेब भानुदास सोमवंशी, यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अंकुश चत्तर हा उपचारा दरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

    सदर घटना गंभीर स्वरुपाची व संवेदनशील असल्याने राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींना अटक करणे बाबत आदेश दिले होते.

    नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोकॉ/बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चापोहकॉ/चंद्रकांत कुसळकर, चापोकॉ/अरुण मोरे तसेच सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना/विशाल दळवी, संदीप दरदंले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ/रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.


    पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपींची ओळख पटवुन नगर शहर परिसरात शोध घेत होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी हे काळ्या रंगाची एमजी कंपनीचे कार क्रमांक एमएच/16/सीएक्स/9393 मधुन अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसल्याने पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन वाशिम येथे जावुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपींची काळ्या रंगाची कार हॉटेल गुलाटीचे बाहेर उभी असलेली पथकस दिसली. पथकाची खात्री होताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इसमाकडे सदर कार बाबत विचारपुस करता त्याने कारमधील इसम हॉटेलमध्ये राहण्यास आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने हॉटेल रुममधील इसमांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाने ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) स्वप्निल रोहिदास शिंदे वय 40, रा. गुरुकृपा सोसायटी, श्रमिक बालाजी चौक, अहमदनगर, 2) अक्षय प्रल्हादराव हाके वय 33, रा. नंदनवन नगर, बंधन लॉन मागे, सावेडी अहमदनगर, 3) अभिजीत रमेश बुलाख वय 33, रा. दिपवन अपार्टमेंट, गजराज फॅक्ट्ररी जवळ, बेहस्तबाग, अहमदनगर, 4) महेश नारायण कु-हेवय 28, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी, अहमदनगर, 5) सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे वय 25, रा. भुतकरवाडी, सावेडी अहमदनगर असे सांगितले. ताब्यातील संशयीताकडे अधिक विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना कार व त्यांचे मोबाईलसह ताब्यात घेतले.
    दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक इतर फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे मिथुन धोत्रे हा रांजणी, बेल्हे, ता. जुन्नर येथे असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ राजंणी, बेल्हे, ता. जुन्नर येथे जावुन खात्री करता दोन इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 6) मिथुन सुनिल धोत्रे वय 23, रा. पवननगर, बेहस्तबाग, सावेडी, अहमदनगर व 7) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.

    आरोपी नामे स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे एकुण -7 गुन्हे दाखल आहेत

    http://newstoday24.co.in/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Video-2023-07-17-at-1.44.45-PM.mp4

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleमराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार – एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पो.अधीक्षक यांची भेट
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.