अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पो.अधीक्षक यांची भेट
खुनी हल्ल्यात मयत झालेले अंकुश चत्तर यांच्या नातेवाईकांनी घेतली पो.अधीक्षक यांची भेट
नगर : नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून याला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे, पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला दिसत नाही. वैयक्तिक कारणातून शहरात किरकोळ स्वरूपाच्या घटना घडतात, त्याचवेळी पोलिसांनी खबरदारी घेवून कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. २०२० ते २०२२ दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती, त्याच धर्तीवर आज नगर शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे, तसेच रात्री मोकाट फिरणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करावी,
तसेच शाळा,कॉलेज परिसरात गस्त वाढवून तपासणी करावी, काळ्या काचेच्या गाड्यांवर कारवाई करा, याचबरोबर अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या नगर शहरातील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा. जेणेकरून कारवाई दरम्यान गुन्हेगार आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील संबंध यामुळे गुन्ह्याच्या तपासात अडथळा येणार नाही, तसेच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले. शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत आमदार संग्राम जगताप यांनी पो.अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते दरम्यान नगरमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा खुनी हल्ल्यात मृत्यू झाला असून त्याबाबत चत्तर यांच्या नातेवाईकांनी देखील पो.अधीक्षक यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली