अहमदनगर ब्रेकिंग : कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, पोकॉ/भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले. पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना दिनांक 17/07/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शुभम चव्हाण हा भांबोरा, ता. कर्जत येथील त्याचे राहते घरी आला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम घरा बाहेर उभा असलेला दिसला. पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम ऊर्फ काळ्या नितीन ऊर्फ आसमानता-या चव्हाण, रा. कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 770/22 भादविक 302, 324, 323, 504, 34 या गुन्ह्याबाबत विचारपुस सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवुल लागला, त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.