अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना चेक करुन हद्दपार गुन्हेगार, हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, सफौ/राजेंद्र वाघ, पोहेकॉ/विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, पोकॉ/रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, रोहित येमुल व चापोना/भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून हद्दपार आरोपींना चेक करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे पथक अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना दिनांक 18/07/23 रोजी पोनि/दिनेश आहेरयांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, हद्दपार आरोपी नामे अतुल दातरंगे हद्दपार असताना लपूनछपून त्याचे राहते घरी टांगेगल्ली, नालेगांव, अहमदनगर येथे वास्तव्य करतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने. पथकाने हद्दपार आरोपी नामे 1) अतुल रावसाहेब दातरंगे रा. टांगेगल्ली, नालेगांव, अहमदनगर हा नालेगांव येथे 02.00 वाचे सुमारास मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षा करीता हद्दपार करण्यात आलेले आहे. नमुद हद्दपार आरोपी हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या नगर शहर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पो.स्टे.गु.र.नं. 797/23 मपोकाक 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही कोतवाली पो.स्टे. करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उविपोअ नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.