Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश – आमदार संग्राम जगताप
    Ahmednagar

    शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश – आमदार संग्राम जगताप

    newstoday24By newstoday24July 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून केडगाव भूषण नगर चौक ( लिंक रोड ) ते कल्याण रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर

    शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश – आमदार संग्राम जगताप

    नगर : शहर विकासासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत असल्याने त्याला यश मिळत आहे. नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत असून दिवसेंदिवस नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केडगाव हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे, या उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी केडगाव भूषण नगर चौक ( लिंक रोड ) रस्त्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये बांधकाम विभागाच्या पुरवणी यादीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी सतरा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता दळणवळणासाठी खूपच महत्वाचा रस्ता आहे, तसेच हा मार्ग पुणे महामार्ग व कल्याण राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. याआधी या भागातील भूषणनगर चौक ते आयोध्या नगर पर्यंत साडे सात कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार कामही सुरू आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात पुढील तीनशे मीटर साठी पाच कोटी रुपये मंजूर झाले होते. आता तिसऱ्या टप्प्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी वर्षभरात मंजूर झाला असून आता 17 कोटी रुपये निधी मंजूर झाला असा एकूण सुमारे 45 कोटी रुपये खर्च करून भूषणनगर चौक ते कल्याण रोड पर्यंतच्या संपूर्ण लिंक रोडचे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे या परिसरात नियोजनबद्ध कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागत आहे. यामुळे केडगावच्या सौंदर्यकरणात व सुशोभीकरणात भर पडेल व शहर विकासाला गती मिळेल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी जेरबंद…
    Next Article ब्रेकिंग : सहआरोपी न करण्यासाठी तीन लाखांची लाच… पोलीस निरीक्षकासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.