संपादकीय ।क्राईम रिपोर्ट। अहमदनगर : ताबा प्रकरण आणखी किती जणांचे बळी घेणार ?
पोलीस प्रशासन गंभीर नसल्याने ताबा प्रकरण जोरात सुरु
अहमदनगर शहरात अॅबट ताबा मारण्यासाठी गुंडांना देतो सुपारी
अॅबट सारख्या लोकांमुळे अहमदनगर शहराला लागली कीड
ताबा प्रकरणाच्या तपासाचा सपाटा लावल्यास अनेक जण समोर येतील
जमिनी खरेदी विक्रीसाठी बनावट कागदपत्र, खोटे शिक्के तयार करून, स्टॅम्पवर नकली सह्या अंगठे घेवून, पैशांच्या देवाणघेवाणीतून फसवणूक करत जागेवर ताबा मिळवण्याचे, अवैध प्रकारे जमिनी जागा प्लॉट हडप करणे, जबरदस्तीने बळकावणे असे प्रकार अहमदनगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असून एखाद्याची जागा गैरमार्गाने खोटे बनावट कागदपत्र देऊन किंवा मारहाण करत धमकी देऊन बळजबरीने जागा हिसकावून घेण्याचे प्रकार नगर शहरात जोरात सुरु आहे, या प्रकारात अगदी जीवघेणे हल्ले देखील होताहेत, जागेवर ताबा मिळवण्याच्या नादात खुनी हल्ले होवून जीव गेल्याच्या घटना देखील या नगरमध्ये घडल्यात, या ताबे मारण्याचे प्रकरण अनेकांनी पोलिसांच्या कानावर घातले, अनेकदा हे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले मात्र या विषयाला पोलीस गांभीर्याने घेत नाही, पोलीस प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने जमिनीच्या ताब्यावरून मुडदे पडतायेत, सध्या अहमदनगर मध्ये खुनाच्या घटना वाढल्या असून यात अनेक खून हे जागेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे,
काही दिवसांपूर्वी नगर शहरात ओंकार उर्फ गामा भागानगरे आणि अंकुश चत्तर या नावाजलेल्या दोन खुनाच्या घटना घडल्या त्यात गामा भागानगरे याचा खून अवैध धंद्यांची तक्रार केल्याच्या रागातून झाला तर अंकुश चत्तर याचा खून कशामुळे झाला याचा शोध पोलिसांनी घेतला असता या खुनाचे मुळ कारण म्हणजे जागेच्या वादातून हा खून झालाय. या चत्तर खून प्रकरणाचा सखोल अगदी खोलात जावून तपास केला असता एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मयत अंकुश चत्तर आणि त्याचा मारेकरी स्वप्नील शिंदे यांच्यात्त जागेचा जुना वाद होता. अॅबट नावाच्या व्यक्तीच्या जागेवर अंकुश चत्तरच्या जवळील माणसाने ताबा मारला होता, तो ताबा त्याने सोडावा यासाठी अॅबट कडून स्वप्नील शिंदेला मोठी बक्षिसी मिळणार होती आणि यामुळेच या जागेवरील ताबा सोडवण्यासाठी तगादा लावत स्वप्नील शिंदे याने अंकुश चत्तरच्या जवळील त्या माणसाविरोधात अनेकदा गुन्हे दाखल केले, यावरून अॅबटचा प्लॉट आणि त्यावरील ताबा सोडण्यासाठी मिळणारी बक्षिसी यामुळे स्वप्नील शिंदे आणि अंकुश चत्तर यांच्यात नेहमीच वाद होत होते, असे बोलले जाते,
दरम्यान अंकुश चत्तर यांचा खून होण्याअगोदर त्याचे काही तरुणांसोबत वाद झाले होते यातील काही तरुण स्वप्निल शिंदेच्या जवळचे होते, त्यामुळे या वादाची माहिती मिळताच स्वप्निल शिंदे घटनास्थळी आला आणि यावेळी अंकुश चत्तरशी असलेला जागेचा जुना वाद स्वप्निल शिंदेच्या डोक्यात होताच तेव्हा स्वप्नीलने हीच संधी साधत हात साफ करत अंकुश चत्तरच्या खुनातील आरोपी झाला, म्हणजेच या खुनाचे मूळ कारण जागेचा वाद असल्याचे समोर आले, पण या जागेचा मालक असल्याचा दावा करणारा अॅबट मात्र इतके दिवस का आणि कसकाय गप्प होता, याआधी त्याने त्याच्या जागेबाबत कधी काही आवाज का उठवला नाही? हा जागेचा ताबा मिळवण्याचा सगळा प्रकार यात काही तरी नक्कीच गोलमाल आहे, बेकायदा जागेवर ताबा मिळवणे यामुळे सर्रास खून केला जात आहे, पोलिसांनी ताबा प्रकरणाच्या तपासाचा सपाटा लावल्यास अॅबट सारखे अनेक जण समोर येतील या ताबा प्रकाराचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, पोलीस प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर या घटना वाढत जातील आणि यामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागेल, ताबा प्रकरणात अनेक बांधकाम व्यावसायिक, तरुण वर्ग, राजकीय मंडळी अडकले जात आहे, हे ताबा प्रकरण थांबणे मोठी गरज आहे. स्वार्थापोटी आर्थिक हितासाठी असे गैरप्रकारे जागांवर ताबा मिळवण्याचे चालू असलेले प्रकार सर्वांसाठीच घातक आहे, नगर मधील या ताबा प्रकरणाकडे वेळीच लक्ष देत माहिती घेवून चौकशी करून पोलिसांनी तपास करत पुढील अनर्थ टाळले पाहिजे, अशी नगरकरांची मागणी आहे.
संपादक : आफताब शेख