अहमदनगर ब्रेकिंग : कोपरगावात धार्मिक ग्रंथाची विटंबना,, मुस्लीम समाजाचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
कोपरगाव तालुक्यातील कॊळगाव थडी येथे अज्ञात समाज कंटकांनी मशिदीतील मुस्लिम समाजाचे पवित्र ग्रंथ कुराण याची विटंबना केली.गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असुन शुक्रवारी मुस्लीम बांधवांच्या ही बाब निदर्शनास आली. यावेळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने मुस्लीम समाज बांधव जमा झाले आणि अज्ञात समाजकंटकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरासह संपूर्ण अहमदनगर जिल्हात धार्मिक वातावरण दुषित करून सामाजीक सलोखा बिघडुन दोन समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न जानिवपूर्वक सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून काल रात्री कोळगांवथडी येथिल मशिदीत घुसुन काही समाज कटांकानी पवित्र धार्मिक ग्रंथाची फोडतोड करुन विंटबना केली. हि बाब अत्यंत संताप आणणारी आहे. हि मात्र घटना नसुन संपुर्ण तालुक्यात शाळकरी विर्ध्यार्थ्यापासुन सर्व सामान्य नागरीकापर्यंत या ना त्या कारणाने त्रास देण्याचे काम जाणिवपुर्वक सुरु आहे. त्यामुळे समाजाच्या भावना तिव्र होत आहे. धार्मीक स्थळ मशिद हे आस्थेचे ठिकाण असून त्याची जर विटंबना होत असेल तर समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याची शकयता आहे. शहर व तालुक्यात सर्व समाज खेळीमेळीच्या वातावरणात राहत असुन शहर व तालुक्यात शांतता राहावी या साठी दोन्ही समाज प्रयत्नशिल असतांना काही समाज कंटक जाणिवपुर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा समाज कंटकांना शोधुन त्यांच्यावर कठोर कायदेशिर कार्यवाही होणे आवश्यक आहे.
सध्याचे वातावरण आधिक दुषित होवु नये म्हणुन आपण योग्य पावले उचलुन कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी कडक पावले उचलावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी डी. वाय. एस. पी. संदीप मिटके सह पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील , पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आदिसह मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.