Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर : भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद…
    Ahmednagar

    अहमदनगर : भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद…

    newstoday24By newstoday24August 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद

    कल्याण रोडवरून आरोपीला अटक; कोतवाली पोलिसांची कामगिरी

     

    नगर —
    भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रम संजय वाणे (वय ३० वर्षे रा. प्रशांत सोसायटी कल्याणरोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. विक्रम वाणे हा त्याच्या कल्याण रोडवरील राहत्या घरी आला असता कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली.
    कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर १३ ऑगस्ट २०२३ रोजी गु.र.नं.। ९२८/२०२३ भा.द.वि. कलम ३७६,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. विक्रम संजय वाणे याने पीडित महिलेला स्वभावाचा फायदा घेऊन भाड्याने घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेले होते. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बळजबरी अत्याचार केला होता. तसेच शारीरिक संबंध ठेवल्या बाबत कोणाला काही सांगितल्यास पीडितेला व तिच्या नवऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना कोतवाली पोलिसांना आरोपी त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपी विक्रम वाणे याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई प्रविण पाटील, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, याकुब सय्यद, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी ऑनलाईन बैठक संपन्न
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : सराफा दुकानात खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा ताब्यात…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.