Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी ऑनलाईन बैठक संपन्न
    Ahmednagar

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी ऑनलाईन बैठक संपन्न

    newstoday24By newstoday24August 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी ऑनलाईन बैठक संपन्न

    ऑनलाईन व्हिसीद्वारे आ.संग्राम जगताप यांची उपस्थिती
     
    सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरण झाल्यावर पूर रेषा स्थलांतरित होणार  

    नगर ; शहरातून वाहत असलेल्या सिनानदीला आलेल्या पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नदीतील पूर नियंत्रण उपाययोजना करून नदीतील गाळ काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्षात सिनानदीची पाहणी केली होती या पार्श्वभूमीवर ही बैठक संपन्न झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा अंतर्गत यांत्रिक विभागाला इंजिनियर,मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरवण्याचे आदेश दिले, याला जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर यांनी मंजुरी दिली, सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरण झाल्यावर पूर रेषा स्थलांतरित होणार आहे. यास त्यांनी मान्यता दिली, तसेच जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी इंधन पुरवण्याचे काम करावे हे जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन व्हिसीद्वारे उपस्थित राहून मान्य केले. तसेच सिना नदीतील काढलेला गाळ पुन्हा नदीत वाहून जावू नये म्हणून त्याची स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर सिना नदीला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल हे सर्व काम पूर्ण झाल्या नंतर सिना नदीची हद्द निश्चित होवून स्थलांतरित होणार आहे, या बैठकीला नियोजन विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर, डॉ. नितीन करीर, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, डॉ. संजय बेलसरे, सचिव, जलसंपदा विभाग, सौरभ विजय, प्रधान सचिव, नियोजन विभाग, वेनुगोपाल रेड्डी, प्रधान सचिव, वने विभाग, आशिष शर्मा, प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, अतुल कपोले, कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते,

        यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, नगर शहरात सिनानदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, पावसामुळे येणारा पुराचे पाणी नगर शहरातील काही भागांमध्ये नागरिकाच्या घरात, दुकानात शिरत असते यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही समस्या लक्षात घेवून तातडीने बैठकीचे आयोजन करत ही समस्या मार्गी लावली, आता सिनानदीचे सुशोभिकरण झाल्यावर सिनानदीला पावसामुळे येणाऱ्या पुराचा प्रश्न मार्गी लागेल, याचबरोबर पूर रेषा स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेल व शहरवासियांसाठी चांगली सुविधा होईल असे त्यांनी सांगितले

    #sangramjagtap #newstoday24
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर : खुनी हल्ल्यातील २ महिन्यांपासून फरार आरोपीला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
    Next Article अहमदनगर : भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    हिंदू धार्मिकतेच्या विरोधात उभारलेले अतिक्रमण सहन करणार नाही : आमदार संग्राम जगताप

    January 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.