sangram jagtap | कर्जत तालुक्यातील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण आमदार आमदार संग्राम जगताप यांनी जय श्री रामाचा नारा व गणपती बप्पा मोरयाच्या जयघोष करत हटविले…
हिंदू धार्मिकतेच्या विरोधात उभारलेले अतिक्रमण सहन करणार नाही : आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर अनधिकृतपणे पणे अतिक्रमण उभारण्यात आले असून वक्फ बोर्डाने देखील दावा केल्याचे नागरिक सांगत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर असून हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असून हिंदू धार्मिकतेच्या विरोधात उभारलेले अतिक्रमण सहन करणार नाही. म्हणून आज सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील थडग्याचे अतिक्रमण शेकडो हिंदू बांधवांच्या साक्षीने काढण्यात आले. यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारचे अनाधिकृत कृत्य करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या थडग्यांविरोधात नगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ.संग्राम जगताप व सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते कर्जतमध्ये दाखल झाले. सदर प्रकरणात मंदिराच्या समोरील काही भागात अनधिकृतपणे थडगे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा भाग वक्क्फ बोर्डाचा असल्याचा दावा काही गटांकडून केला जातो. मात्र, हिंदू समाजाने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्धार केला असून आज गुरुवारी सकाळपासून आ. संग्राम जगताप व सागर बेग आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा ताफा सिद्धटेक मध्ये दाखल होत जय श्री रामच्या व गणपती बप्पा मोरयाच्या घोषणा देत अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले.