अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार; आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होत आहे. विशेषतः मध्यवर्ती शहरात बाजारपेठ व इतर प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत आहेत. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्याने आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपऱ्या, हातगाड्या, फलक व इतर कोणतेही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमण धारकाला परत केले जाणार नाही. वारंवार कारवाई करून दंड आकारून सोडण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून
अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाच्या नियोजित कारवाईचा तपशील…
फेब्रुवारी २०२५ १० फेब्रुवारी: स्वस्तिक चौक पुणे बस स्टॅण्ड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केटयार्ड चौक माळीवाडा वेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
११ फेब्रुवारी: हातमपुरा चौक जुने जिल्हाधिकारी कार्यालय जीपीओ चौक अशोका हॉटेल झेंडीगेट परिसर
१२ फेब्रुवारी: माळीवाडा वेस आशा टॉकीज परिसर भिंगारवाला चौक एम.जी. रोड गंजबाजार परिसर
१३ फेब्रुवारी: माणिक चौक भिंगारवाला चौक एम.जी. रोड शहाजी रोड नवीपेठ बैंक रोड लक्ष्मीबाई कारंजा गांधी मैदान चितळे रोड
१४ फेब्रुवारी: दाळमंडई आडतेबाजार तेलीखुंट चितळे रोड नेहरू मार्केट चौपाटी कारंजा दिल्लीगेट
१७ फेब्रुवारी: जुना दाणे डबरा मंगलगेट परिसर राज चेंबर कोठला परिसर एस.टी. वर्कशॉप रामवाडी
१८ फेब्रुवारी: सर्जेपुरा चौक रंगभवन लालटाकी परिसर सिव्हील हॉस्पिटल
२० फेब्रुवारी: दिल्लीगेट सिद्धीबाग बालिकाश्रम रोड सावेडीगाव
२१ फेब्रुवारी: टी.व्ही. सेंटर प्रोफेसर कॉलनी भिस्तबाग रोड भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड श्रीराम चौक शिलाविहार गुलमोहर रोड पोलीस चौकी पारिजात चौक गुलमोहर रोड ते भिस्तबाग रोड
२४ फेब्रुवारी: पत्रकार चौक मनमाड रोड नागापूर मनपा हद्दीपर्यंत
२५ फेब्रुवारी: हॉटेल चैतन्य क्लासिक काकासाहेब म्हस्के कॉलेज ते गांधीनगर
२७ फेब्रुवारी: पाईपलाईन रोड डी मार्ट बंधन लॉन आठरे पाटील पब्लिक स्कूल तपोवन रोड भिस्तबाग महाल नाना चौक ढवण वस्ती ते जुना पिंपळगाव रोड
२८ फेब्रुवारी: कोठला स्टॅण्ड डी.एस.पी चौक छत्रपती संभाजी महाराज रोड वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल [ मार्च २०२५ ]
३ मार्च: छत्रपती संभाजी महाराज रोड फरिस्ता ऑफिस ते बडी मस्जिद पाण्याची टाकी ते मेराज मस्जिद राजनगर गाडे शाळा टॉपअप पेट्रोल पंप
४ मार्च: कोठला स्टॅण्ड जीपीओ चौक चांदणी चौक कोठी चौक मार्केटयार्ड चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सक्कर चौक कायनेटिक चौक
५ मार्च: सक्कर चौक मल्हार चौक रेल्वे स्टेशन परिसर कायनेटिक चौक
६ मार्च: कायनेटिक चौक केडगाव अंबिकानगर बस स्टॉप केडगाव परिसर
७ मार्च: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाणक्य चौक बुरुडगाव रोड यश पॅलेस हॉटेल आनंदऋषी हॉस्पिटल चाणक्य चौक महात्मा फुले चौक ते कोठी
१० मार्च: सक्कर चौक टिळक रोड आयुर्वेद कॉलेज अमरधाम नेप्ती नाका कल्याण रोड रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे