Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Blog»नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 
    Blog

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    newstoday24By newstoday24March 16, 2025Updated:March 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगर ब्रेकिंग : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील अनोळखी तरुणाच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे तसेच आरोपीने गुन्हयांची कबुली देखील दिली आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/03/2024 रोजी दाणेवाडी, ता.श्रीगोंदा येथे विठठल दत्तु मांडगे, रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यांचे शेतातील विहीरीमध्ये अनोळखी मृत व्यक्तीचे कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कसल्यातरी हत्याराने मृत व्यक्तीचे मुंडके, दोन्ही हात, उजवा पाय धडावेगळे करून त्यास जीवे ठार मारून, मृतदेह पोत्यात भरून टाकले. याबाबत पोसई/मारूती केशव कोळपे, नेमणुक बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं 81/2025 बीएनएस कलम 103, 238 (अ) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करून, पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.

    सदरची घटना घडल्यानंतर पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी घटनाठिकाणी भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरूण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालींदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

    पथकाने घटना ठिकाणच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन, जिल्हयातील तसेच शिरूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसींगची माहिती घेऊन, मृतदेहाचे फोटो व कानातील बाळी तसेच मयताचे यापुर्वीचे फोटो यावरून पथकाने मयताचे नातेवाईक यांचेकडे चौकशी करून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली.तपासात अनोळखी मृतदेह हा मयत माऊली सतीष गव्हाणे, वय 19, रा.दानेवाडी, पो.राजापूर, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याचा असल्याचे निष्पन्न केले.

    दि.16/03/2025 रोजी तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) सागर दादाभाऊ गव्हाणे, वय 20, रा.दानेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली आहे.तसेच सदरचा गुन्हा ताब्यातील आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहेत.

    सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

    #Ahmednagar #Breaking #News #Breaking #Update #News #Crime 3Police #Murder #srigonda
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार
    Next Article पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.